सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व म्हणून सतीश जाधव यांनी कुकुडवाड पंचायत समिती निवडणूक लढवावी सामान्य जनतेतून होतेय मागणी…
कुकुडवाड (प्रतिनिधी): कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील जनतेचा असंतोष पाहता येणारी जिल्हा परिषद निवडणूक जनता हातात घेऊन इथे सर्वसामान्य युवकांना संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .अजून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी वेळ असताना गेली दोन महिने या गटातील सर्व सामान्य मतदार स्वतः निवडणूकी बाबत चर्चा करत आहेत. कारण इथल्या सामान्य माणसाला परिवर्तन पाहिजे आहे म्हणून कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील मतदार निवडणुकीची वाट पाहत आहे. अश्या वेळी इथले युवक काही सुसंस्कृत युवकांना उमेदवार होण्यासाठी गळ घालत आहे त्या मध्ये सर्वसामान्य व्यक्ती व उधोजक सतीश जाधव यांनी कुकुडवाड पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेतून होत आहे सतीश जाधव हे अगासवाडी गावचे युवक असून कुकुडवाड परिसरातील युवकांना मुंबई नवी मुंबई येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे माण तालुक्यातील पदाधिकारी म्हणून काम केले आहे तळागाळातील युवकांच्या संपर्कात ते सतत असतात
कुकुडवाड जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर विकासाचा अनुशेष आहे त्या मुळे या निवडणुकीत युवकांना मोठी संधी असून या ठिकाणी सर्वसामान्य उमेदवार विजयी होईल यात अजिबात कोणाच्या मनात शंका नाही म्हणूनच सतीश जाधव यांच्या सारख्या पारदर्शक युवकाने निवडणूक लढवल्यास निश्चित या परिसरातील विकासाचा अणुशेष भरून निघेल यात शंका असण्याचे कारण नाही
इथला गरीब हलाकीचे जीवन जगत आहे आज या परिसरातील युवक शिक्षित असूनही मातीकाम करण्यासाठी वसई सारख्या दुर्गम प्रदेशात जात आहे तिथे आपले जीवन जगत आहे या परिस्थिती कडे जनतेने गंभीर होऊन विचार करून बदल घडवला पाहिजे आजच्या परिस्थितीत कुकुडवाड जिल्हा परिषद गटात परिवर्तन करण्यासाठी जनता स्वतःहून एक पाऊल पुढे येत आहे हे या गटाचे वैशिष्ट्य मानावे लागेल
कुकुडवाड गटाचा च्या अंतर्गत डोगरी प्रदेशात राहणारे काही भाग मोडतात आज या वाड्या वस्त्यावर पक्का रास्ता झालेला नाही स्थानिक स्वराज संस्थे मधून जी कामे करायची आहेत ती होऊ शकली नाहीत त्याचा परिणाम आज इथली जनता भोगत आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे अशी या भागातील जनतेची अपेक्षा आहे
म्हणूनच सतीश जाधव यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी कुकुडवाड परिसर मित्र समूह यांच्या माध्यमातून होत आहे.













Leave a Reply