जनतेला हेवा वाटेल असा कुकुडवाड गट निर्माण करण्यासाठी पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक ताकतीने लढवणार : युवराज मगर पाटील
दहिवडी प्रतिनिधी: राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जवळ आल्या असताना राजकीय धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे या वेळी माण तालुक्यात कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक अतिशय कडवी होणार असल्याचे सद्या तरी दिसून येत आहे सातारा जिल्ह्यात कोणत्याही गटात निवडणुकीला सुरवात झाली नसताना गेली दोन महिने या गटात निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला आहे युवकांनी ही निवडणूक आता पासून हातात घेण्यास सुरुवात केली असून या मोहिमेचे नेतृत्व स्वाभिमानी सगटनेचे सातारा जिल्हा जिल्हा अध्यक्ष युवराज मगर पाटील करत आहे
जिल्हा परिषद निवडणूक ताकतीने लढणार असल्याचे
युवराज मगर पाटील यांनी बोलताना स सांगितले कुकुडवाड जिल्हा परिषद गट सातारा जिल्ह्यातील अतिशय भकास गट म्हणून ओळखला जातो त्या भागाकडे विकासाच्या कोणत्याही योजना नाहीत आमदार व खासदार यांच्या निधीतून जी काही कामे झाली त्या पलीकडे स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून काहीही झालेले दिसून येत नाही या भागातील जनतेला किती अडीअडचणी ना सामना करावा लागत आहे याचं प्रत्यक्ष दर्शन सोसियाल मीडियाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊन जनजागृती अभियान युवकांनी राबवले आहे या वरून इथली परस्थिती लक्ष्यात येते म्हणूनच येणारी निवडणूक विकासाच्या मुद्दा हातात घेऊन ताकतीने लढवणार असल्याचे युवराज मगर पाटील यांनी सांगितले
आजही कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील वाड्या वस्त्यावर पक्के रस्ते नाहीत ऊसतोड करण्यासाठी आजही इथला युवक जातोय.मातीकाम करण्यासाठी सर्वात जास्त युवक कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील आहेत हे थांबले पाहिजे या साठी जनतेने परिवर्तन केले पाहिजे या साठी येत्या काही दिवसात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे असे युवराज मगर पाटील यांनी पत्रकारांना सांगितले
लोकांना या गटा बाबत हेवा वाटेल असाच गटाचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे असे मत मगर यांनी व्यक्त केले.













Leave a Reply