नरवणे गावच्या तलाठ्यांचा दहिवडी येथून कारभार. माण तहसीलदार व प्रांत साहेब लक्ष देतील काय?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नरवणे गावच्या तलाठ्यांचा दहिवडी येथून कारभार.

सातारा प्रतिनिधी:

नरवणे गाव चे तालाठी दहिवडी येथून कामकाज करत आहेत या मुळे गावातील लोकाना दहिवडी येथे जाऊन आपली कामे पूर्ण करावी लागत आहेत. विद्यार्थ्यांना एक दाखला काढायचा असल्यास दहिवडी येथे पायपीट करावी लागते तरीही तेथे हे तलाठी महाशय भेटतील असे सांगत येत नाही, लोकांनी फोन करून विचारणा केली तर मी कामानिमित्त बाहेर आहे पुन्हा भेटू अशीच यांची पद्धत असते. गावातील लोकाना एक सातबारा पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला कोणीतरी तलाठ्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोधावे लागते त्या नंतर सातबारा काढण्यासाठी पैस्याचा आकार तर वेगळाच असतो.अश्या मुजोर तलाठ्यांना प्रत्येक दिवशी गावच्या तलाठी कार्यालयात बसण्यासाठी माण तहसीलदार व उपविभागीय अधिकारी आदेश देतील काय? इतके दिवस महसूल अधिकारी तालुक्यातील नरवणे गावचे तलाठी गावात जात नाही या बाबत गप्प कसे काय आहेत? हा पण प्रश नरवणे ग्रामस्थांना पडत आहे. दहिवडी येथे मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसून हे तलाठी मंडल अधिकाऱ्याचे काम करतात की काय? कारण हे मंडल अधिकारी पण यांना गावात जाऊन काम करण्याचा सल्ला देत नाहीत हे फार मोठे विशेष.या तलाठ्यांच्या मोठा वशीला असेल तर त्यांनी जबाबदारी मधून बाहेर पडावे आणि निवांत बसून पगार घ्यावा पण खेड्यातील जनतेला त्रास देऊ नये.नरवणे गावच्या
लोकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून गैरसोय करणारे तलाठी या पुढेही गावात येऊन काम करतील काय?

      वरिष्ठ अधिकारी नरवणे गावचे तलाठी यांना गावातून काम करण्याचे आदेश देतील काय?
नरवणे गावात इंटरनेट ची सोया आहे त्या मुळे त्याना कामकाज करण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही असे असताना जाणीवपूर्वक दहिवडी तुन कामकाज करणे आणि जनतेला नाहक त्रास देणे हे तालुका महसूल अधिकाऱ्यांनी थांबवले पाहिजे
दहिवडी येथे येणे जाणे गावातील विद्यार्थ्यांना सहज शक्य नाही त्यात एसटी नाही दिवसातून एकवेळ एसटी ची सेवा असते अश्या जाचातून गावातील लोकांना महसूल अधिकारी मदत करतील काय?अश्या प्रतिक्रिया गावच्या नागरिकांतून उमटत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *