“हिटलरशाही सरकार “ शेवटी ऐतिहासिक वारसा असलेला वाई चा पुल पाडला! वाईकरांना ऐतिहासिक वारसा जपता आला नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ऐतिहासिक वारसा जपण्याची शिकावे ते आपल्या शेजारी असलेल्या देशांकडून त्यांनी जरी त्यांचे राहणीमान आधुनिक युगात सारखे केले ठेवले असले तरी त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारसा जपणे त्यांनी कधी सोडले नाही पण आपल्याकडे या उलट आहे जुने जुने द्यावयाचे सोडून नवीन घ्यावयाचे रेटून अशी आपली अवस्था आहे मला एक समजते जुन्या वास्तू मग ते पूल किंवा मोठ्या इमारती वाडे असतील हे खरंच नसते तर काय झाले असते पूर्वीच्या माणसांनी आपला भविष्यकाळ म्हणजे आत्ताच्या एकविसाव्या शतकात या काळापर्यंत विचार करून त्यांनी त्या त्यांच्या काळात असणाऱ्या कुठल्याही गोष्टी मग कोण असो किंवा इमारती ह्या त्या त्या भविष्यकाळाच्या आत्ताच्या रचनेनुसार त्या व्यक्तींनी बांधणी केली आत्ता आमच्या कृष्णा नदीवरील पुल वाहतूक ही अतिशय जड आहे आत्ताचा नवीन आरसीसी पुल सुद्धा त्या अतिशय जड वाहतुकी पुढे दम सोडेल पण आमच्या पूर्वजांनी बांधलेला पूल त्या काळातला आता सुद्धा दिमाखात उभा आहे तो पण प्रत्येक ऋतूचा सामना करत आहे ऊन वारा पाऊस अतिशय दूरदृष्टी ठेवून पूर्वजांनी अशी या पुलांची रचना केली आहे त्या वास्तूंचा वेळो वेळी मेन्टेनन्स करत असायची त्यावेळी आणि आत्ता माणसाचे विचार कमकुवतच असावेत असं मला वाटतं त्यांनी त्या वेळेस त्या पुलाची बांधणी करून आपल्याला आत्तापर्यंत हा पुलाची सेवा मोफत दिली आपल्याला तरी सरकार असो किंवा कुठले संबंधित अधिकारी कलेक्टर साहेब असतील याकडे दुर्लक्ष न करता या गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे म्हणून पुरातत्त्व खाते किती सक्रीय असते. लोकांचे प्रबोधन करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याकडे नागरिकांचा कल आपसूक वाढत असतो. सातारा जिल्ह्याला तर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यातच कृष्णातिरी वसलेल्या वाई गावाला तर जाज्वल्य इतिहास आहे. आणि याच कृष्णा नदीवर असलेला ऐतिहासिक पूल पाडला गेला . हे भयानक चित्र इथल्या ग्रामस्थांना पहावेनासे झाल्यामुळेच त्यांच्यामध्ये तीव्र आक्रोश

मदन साबळे, सामाजिक कार्यकर्ते
वडूथ सातारा
9763477700

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *