*सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्ग 965D चे डांबरीकरण काम सुरू* *सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्या पाठपुराव्याला यश*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*रस्त्यावर मजबूतीकरण डांबरीकरणाचे काम कधी होणार असा विचारला जात होता सवाल*

* लाईव्ह महाराष्ट्र 24 सातारा विशेष प्रतिनिधी *

सातारा ते लोणंद पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग ९६५ड या रस्त्याचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून येथीललोकप्रतिनिधीच्या अनास्थेमुळे खोळंबले होते. सातारा ते आदारकी फाटा इथपर्यंतचे काम झालेले होते. मात्र त्या पुढील रस्त्याचे अर्थातआदारकी फाटा ते लोणंद या रस्त्याच्या कामाला गेल्या कित्येक दिवसांपासून विलंब होत होता. मात्र सातारा येथील सामाजिककार्यकर्ते मदन साबळे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर भारतीय राजमार्ग प्राधिकरणाने 12 कोटी 89 लाख 61 हजार 423 रुपयांचानिधी दिला आहे. परिणामी या रस्त्याच्या कामाला गती मिळाली आहे.खासदार उदयनराजे भोसले, तसेच आमदार महेश शिंदे यांच्यामार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी भारतीय राजमार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेरत्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून मदन साबळे यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावहोत आहे.

सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अधिकारी शत्रुघ्न काटकर, कंत्राटदार धीरज तसेचत्यांचे साईट इंजिनर पवन सिंग यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. तर अतिशय बिकट परिस्थिती असतानाही केवळसामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्या सहकार्यामुळेच या रस्त्याचे काम आपण उत्तमप्रकारे करू शकलो, असे शत्रुघ्न काटकर यांनीसांगितले.

वाठार स्टेशन ते लोणंद हा महामार्गाचा काही भाग फलटण विधानसभा मतदारसंघात आहे. तर काही भाग वाई विधानसभा मतदारसंघातयेतो. त्याचप्रमाणे लोकसभेच्या दोन मतदारसंघात याची विभागणी होते. एक माढा आणि दुसरा सातारा. या भागातीललोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या रस्त्याचे काम आतापर्यंत खोळंबले होते. या रस्त्यासाठी पाठपुरावा करणार कोण. असा सवालवारंवार विचारला जात होता. मात्र सातारा, वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी या रस्त्याचे काम करून घेऊ, असानिश्चय केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले, असल्याची माहिती मदन साबळे यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 ला दिली.

प्रतिक्रिया

लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा रस्ता खोळंबला. या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना विचारा काय अडचणींचा सामनाकरावा लागत होता. खासदार उदयन महाराजांनी आणि आमदार महेशजी शिंदे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे मी लोकांना जो शब्द दिला होता. तो शब्द पूर्णत्वास नेऊ शकलो. जनतेनेअसेच प्रेम करावे. जनतेचे कोणतेही काम असूद्या निस्वार्थी भावनेने ते मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

मदन साबळे,

सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा भारत, सातारा

———————————–

अनेक बिकट प्रसंगांना सामोरे जात असताना मदन साबळे यांनी आम्हाला मोलाची साथ दिली. वेळोवेळी त्यांनी सहकार्य केले. त्यांच्यासामाजिक प्रोत्साहनामुळेच या कामास खर्या अर्थाने चांगली सुरुवात आम्ही करू शकलो. मदन साबळे यांचे खूप खूप आभार. भविष्यातही साबळे यांच्याकडून अशी साथ मिळेल, अशी आशा करतो. अनावधानाने काही चुका झाल्यास त्या त्या वेळी दुरुस्त करूनउत्तम काम करण्याचा आम्ही सकारात्मक प्रयत्न करू.

शत्रुघ्न काटकर,

अधिकारी, भारतीय राजमार्ग प्राधिकरण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *