॥ श्री कार्तिक स्वामी महोत्सव २०२१ श्री खलवेश्वर मंदिर , बोरखळ , ता . जि . सातारा घ्यावा मिती कार्तिक शुध्द त्रिपुरारी पौर्णिमा १५ शके १ ९ ४३ शुक्रवार दि .१ ९ / ११ / २०२१ रोजी कार्तिक स्वामी महोत्सव साजरा होत आहे १९/११/२०२१

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

#श्री_कार्तिकेय हे भगवान शंकर व माता पार्वती यांचे जेष्ठ चिरंजीव व श्रीगणेशाचे जेष्ठ बंधू. श्री कार्तिकेय हे देवाच्या सैन्याचे सेनापती होते. त्यांचा जन्म स्कंद षष्ठी या दिवशी झाला. अशी एक आख्यायिका आहे की जेव्हा श्री गणेश व श्री कार्तिकेय यांच्या मध्ये विश्व परिक्रमा करण्याची स्पर्धा झाली होती तेव्हा श्री कार्तिकेय विश्व परिक्रमेला निघून गेले परंतु श्री गणेशांनी पिता शंकर भगवान व माता पार्वती देवी यांनाच विश्व मानून त्यांचीच परिक्रमा पूर्ण केली आणि ती स्पर्धा श्री गणेश जिंकले होते परंतु या गोष्टीमुळे श्री कार्तिकेय नाराज झाले आणि त्यांनी शपथ घेतली की मी समस्त स्त्रीजातीचे तोंड देखील पाहणार नाही. या नंतर माता पार्वती यांनी त्यांची खूप विनवणी केली आणि शेवटी त्यांनी कार्तिकेय पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी मी स्त्रियांना दर्शन देईन असे मान्य केले. आणि म्हणूनच पूर्ण वर्षभरातून त्रिपुरारी पौर्णिमेचा एकच असा दिवस आहे की ज्या दिवशी स्त्रिया श्री कार्तिकेयांचे दर्शन घेऊ शकतात. श्री स्वयंभू खलवेश्वर देवस्थान
मौजे बोरखळ ता. जि. सातारा या ठिकाणी आहे. येथे श्री खलवेश्वराचे अतिप्राचीन असे मंदिर आहे . या मंदिराचे वैशिष्ट्य असे की या मंदिरात श्री शंकर भगवान व माता पार्वती यांचे संपूर्ण कुटुंबाचे वास्तव्य या मंदिरात आहे म्हणजेच या मंदिरात श्री महादेव यांची स्वयंभू पिंड तसेच माता पार्वती जेष्ठ पुत्र कार्तिकेय आणि कनिष्ठ पुत्र श्री गजानन यांच्या सुबक अशा मुर्त्या आहेत.
वर्षानुवर्षे या मंदिरामध्ये या संपूर्ण कुटुंबाची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. दरवर्षी ग्रामस्थ व तरुण मंडळ यांच्या वतीने श्री कार्तिकस्वामी महोत्सवाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात केले जाते. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे कीर्तन भजन यांचे आयोजन केले जाते.
महोत्सव खूप उत्साहात पार पडतो.
सदर महोत्सवाची सुरुवात होते ती त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची पालखी संपूर्ण ग्रामपरिक्रमा पूर्ण करून श्री खलवेश्वराचे मंदिरात मुक्कामासाठी ठेवली जाते. या नंतर रात्री पासून पहाटे पर्यंत ग्रामस्थ #श्री_शिवलिलामृत ग्रंथाचे वाचन करतात. या नंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते ती श्री कार्तिकस्वामी यांच्या महाभिषेकाने. पहाटेच श्री कार्तिकस्वामी यांना दूध,दही, मध तसेच थंड व गरम पाण्याने शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक घातला जातो. या नंतर श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होते. यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. शेवटी रात्री श्री खलवेश्वर मंदिर प्रांगणात दीपोत्सव व #श्री कृष्णामाईची भव्य अशी आरती होते व नंतर सुश्राव्य अशा भजनाने या महोत्सवाची सांगता होते.अशा या मंगलमय सोहळ्याला पुणे-मुंबई येथून सुध्दा भाविक भक्त येतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *