कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील युवक सामाजिक व राजकीय परिवर्तन करण्यासाठी एकत्रित मोट बांधणार!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील युवक सामाजिक व राजकीय परिवर्तन करण्यासाठी एकत्रित मोट बांधणार!

दहिवडी: कुकुडवाड जिल्हा परिषद गट हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला राहिलेला असला तरी विधान सभा निवडणुकीत भाजपला मोठी मदत या गटाने दिली होती त्याच बरोबर वरकुटे गणातील पंचायत समिती सदस्य हे सुद्धा आज भाजप विचारसरणी च्या आहेत या गटाचा नेहमी मतासाठी वापर झालेला आहे. अशी प्रतिक्रिया इथले युवक उघड उघड बोलू लागले आहे निवडणूक आणि मतदाना वेळीच विकासाची गंगा इथं निर्माण होते आश्वासने मिळतात परंतु त्या नंतर या परिसराचे चित्र वेगळेच असते या परिसरात विकास म्हणजे काय कुठे असतो कसा तो पाहण्यासाठी लोक आतुर झालेले आहेत कारण ही तसेच आहे या विभागात मोठ्या प्रमाणावर वाड्या व वस्त्या आहेत या वाड्यात फक्त निवडणूक आली की आवर्जून पाहिले जाते मोठी मोठी आश्वासने दिली जातात परंतु निवडणूक झाल्यावर इथं साधे पोराच्या ऍडमिशन साठी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी येत नाहीत इतर कामे सोडूनच द्या एक दोन मोठ्या माणसाचे ऍडमिशन साठी फोन केला म्हणजे आमचं काम झाले आणि आम्ही विकास केला असे मिरवत सांगणारे पुढारी इथं पहायला मिळत असून अश्या पुढार्यांना या पुढे सर्व युवा संघटना एकत्र येऊन योग्य तो धडा शिवणार असल्याचे युवकाचे मत आहे या मतदारसंघात अजूनही वाडी वस्तीवर एसटी पोहचली नाही आणि कागदावर हजारो कोटीच्या गप्पा दिसून येत आहेत आता इथला युवक नक्की कागदावरचा विकासा ला भुलणार नसून लवकरच एक मेळावा घेऊन पुढील परिवर्तनाचा मार्ग निवडण्याचा निर्णय घेण्याची तयारी इथला बहुजन समाज व युवक एकत्रितपणे येऊन घेत आहेत असे स्पष्ट दिसते आहे या मतदारसंघात भाजप आपली ताकत आक्रमक पणे वाढवत असून हा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत जिकायचाच असा निर्धार करून आता पासून भाजप रणांगणात उतरला असून आरक्षण कोणतं ही पडले तरी चालेल पण कार्यकर्त्याची बांधणी मोठ्या प्रमाणात भाजप चे नेते करताना दिसून येत आहे त्या मुळे कुकुडवाड गटातील निवडणूक या पुढे विकासाच्या मुद्यावर लढवली जाईल असे दिसते

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *