*समाजहितासाठी सदैव झटणारा सच्चा पोलीस मित्र, उदय आठल्ये…*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*समाजहितासाठी सदैव झटणारा सच्चा पोलीस मित्र, उदय आठल्ये…*

पोलिसांचे चांगले काम समाजाला कधी दिसत नाही. मात्र पोलीसांची चुकीची बातमी आली की त्याचे वाईट अर्थाने भांडवल केले जाते. परंतु पोलीस मित्र उदय आठल्ये याला अपवाद आहेत. दररोज पोलीसांचे कौतुक करणे पोलीसांच्या कामांविषयी लेखन करून समाजासमोर पोलिसांची देखणी प्रतीमा मांडणे तसेच पोलीस अमंलदार व अधिकारी यांची प्रतिमा जनमानसात चांगल्या रुपात पसरवणे यांमुळे सर्व सामान्यांना पोलीस म्हणजे काय हे समजत आहे. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी 2016 साली पोलीस मित्र ही अभिनव संकल्पना अस्तित्वात आणली. ज्यांना पोलिसांना पर्यायाने समाजाला मदत करायची त्यांनी पोलीस मित्र बनावे, अशी ती संकल्पना. राज्यात पोलीस मित्र म्हंटले की अतिशय संवेदनशील विषय डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र सध्या सातारा शहरतात पोलीस मित्र म्हटले की, पटकन डोळ्यासमोर एकच चेहरा पहायला मिळतो तो म्हणजे उदयजी आठल्ये यांचा.
————————————————————————————-

सातारा जिल्ह्याचे सुपुत्र उदय आठल्ये यांना मुळातच समाजसेवेची आवड. तसेच प्रामाणिकपणे कष्टाची जोड. स्वतःचा स्थानिक व्यवसाय सांभाळून पोलीस मित्र म्हणून महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत. स्वतःचा कोणत्याही प्रकारे फायदा न करून घेता बेकायदेशीर कामांंपासून लांब राहणे ही उदय आठल्ये यांची महत्त्वाची भूमिका असते. आठल्ये यांच्या याच कार्यामुळे पोलीस अधिकारी वर्गदेखील प्रभावित झाला आहे. पोलिसांचा मित्र या नावाखाली बरेच लोक स्वतःचा फायदा करू पाहतात… प्रामाणिकपणे आपले काम बजावणे बोटावर मोजण्याइतक्याच लोकांना जमते. मात्र उदय आठल्ये हे कुठलीही अपेक्षा न बाळगता प्रामाणिकपणे पोलीसांना सहकार्य आणि समाजसेवा हा स्वधर्म मानून निस्वार्थपणे या कार्यात कार्यरत आहेत. नेहमी वेगवेगळे उपक्रम अवलंबून समाजाच्या हिताचा विचार करण्यात नेहमी तत्पर असतात. समाजकार्याच्या नावाखाली स्वतःची स्तुती करून फक्त सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी ककरणे यातून समाजकार्य होत नसते. त्यासाठी समाजाप्रती ओढ श्रद्धा आणि कर्तृत्वाची जाणीव ही लागते. हे सत्य उदय आठल्ये यांनी त्यांच्या समाजकार्यातून दाखवून दिले.

पोलिस व पोलीस मित्र संकल्पना या साठी आली की अधिकारी/ कर्मचारी व पोलीस मित्र यांच्यामध्ये समन्वय राहावा. सण उत्सवाच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी पोलीस मित्रांचा उपयोग व्हावा. पोलिसांच्या अडी-अडचणी समजून घेणे यासाठी ही संकल्पना राज्यात आली. सुरुवातीच्या काळात ही संकल्पना चांगल्या प्रकारे सूरु झाली. पोलीस दलास त्याचा फायदा देखील होत गेला. परंतु पोलिसांनी दिलेल्या ओळखपत्राचा गैरवापर व बेकायदेशीर कामे करण्यास पोलीस मित्रांनी सुरुवात केली. म्हणून पोलीसांना, पोलीस मित्रांवर, गुन्हेदेखील दाखल करावे लागले. याबाबत अनेक तक्रारी राज्याच्या पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर ही संकल्पना लोप पावत गेली. मात्र सातारच्या उदय आठल्ये या पोलीस मित्राने ही संकल्पना अजून ही जिवंत ठेवली आहे. हेच आपल्या कार्यातून दाखवून दिले. सुरुवातीच्या काळात उदय आठल्ये यांना खूप त्रास सहन करावा लागला. पूर्वीच्या पोलीस मित्रांनी केलेल्या चूकीचे कामे त्यांची छाप उदय आठल्ये यांच्या नावावर लागत होती. परिणामी उदय आठल्ये यांनी पोलीस मित्र होण्यास नकार दिला. परंतु आपण चूकीचे काम करणार नाही हा आत्मविश्वास त्यांच्या मनात होता.आणि त्यांनी निर्धार केला. आपण यामध्ये सक्रीय सहभाग घेऊन पोलीसांसाठी सामाजिक कार्य करता येईल हाच त्यांनी विडा उचलला…
सूरवातीच्या काळात त्यांनी पोलीस दलाची अडचण काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निदर्शनास पोलीस वसाहत रस्त्याची बिकटस्थिती लक्षात आली. तत्काळ त्यांनी ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निर्दशनास आणून दिली. सदर रस्त्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे पाठपूरावा, करुन नवीन रस्ता मिळवून देण्यास प्रयत्नशील राहीले. तसेच आपल्या पोलीस बांधवाना चांगला रस्ता मिळवून देण्यासाठी आठल्ये यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संपूर्णपणे वाहतूक टप्प झाली. त्या दरम्यान, शाहूपूरी पोलिसांनी एक आवाहन केले होते आनेवाडी टोल नाका येथे वाहतूक करणारी वाहने उभी आहेत त्यांना चहा, पाणी, नाश्ट्याची व्यवस्था करायची आहे. ही माहिती वाचताच उदय आठल्ये यांनी शाहुपूरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मुगूटराव पाटील यांना संपर्क करुन अल्पोपहाराची आपण स्वतः व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. यासाठी संपूर्ण मदत वडुथ येथील व्यापारी नितीन साबळे यांनी केली. व त्यानंतर चांगल्या पद्धतीने एक अन्नदान कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उदय आठल्ये यांची छाप हळू हळू पोलीस दलात पडत गेली. या दरम्यान, कोल्हापूर येथे आलेल्या महापूरातील पिडीतांना कपडे पाठवण्याबाबतचे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पोलीस मित्र उदय आठल्ये यांनी तत्काळ पोलीस अधिकारी समीर शेख यांना संपर्क केला व नव्या सा़ड्या पाठवण्याबाबत मी इच्छूक आहे, असे सांगितले. या वेळी पोलीस अधिकारी समीर शेख यांनी देखील आठल्ये यांचे कौतुक केले. या वेळेस वडुथ येथील सरस्वती कलेक्शनचे मधूकर अंतोबा साबळे यांनी सहकार्य करुन या कार्याला 270 नवीन साड्या दिल्या.

या दरम्यान, ज्या ज्या वेळी सातारा पोलीस दलातील काही पोलीसांच्यावर अन्याय झाला. त्या त्या वेळी उदय आठल्ये यांनी आपल्या पोलीस बांधवाची बाजू घेऊन पोलीसांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले. याच्याहून एक पाऊल पूढे टाकत पोलीस अधिकारी व अमंलदार यांचा वाढदिवस असला की उदय आठल्ये आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात.
कोरोनाच्या महामारीत सातारा पोलीसांसाठी उदय आठल्ये यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक बांधिलकी जोपासली. देशात लॉकडाऊन घोषित झाला व पोलीस दल रस्त्यावर उभे होते. पोलिसांनी घरादारावर तूळशीपत्र ठेवून आपले कर्तव्य बजावले. लॉकडाऊनच्या काळात पोलीस मित्र उदय आठल्ये यांनी संपूर्ण सातारा शहरात सुमारे तीन वेळा चहा, पाणी, नाश्ट्याची व्यवस्था केली होती.
सुमारे चार वर्ष पोलीस मित्र म्हणून आपले सामाजिक कार्य करणारे उदय आठल्ये यांची दखल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेत कौतुकदेखील केले. संकटकाळी मदतीला धावतो तोच खरा ‘मित्र’ ही म्हण आपल्याकडे अनेक पिढ्यांपासून प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती या पोलिस मित्राद्वारे नेहमीच होत असते. जीवनात येऊन सामाजिक भावना जोपासली पाहीजे. आपण समाजाचे सामाजिक ऋण यानिमित्ताने फेडू शकतो, अशी काही भावना पोलीस, मित्र उदय आठल्ये यांच्यात पहायला मिळते.

आजकाल समाजात चाललेल्या आणि वाढणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना सुद्धा अनेक शत्रूंचा सामना करावा लागतो. तहान-भूक, ऊन, वारा विसरून स्वतःचा जीव कुटुंब विसरून पोलीस रस्त्यावर असतो. आणि कुठे तरी पोलिसांना मदत करणे हेच काम पोलिस मित्र उदय आठल्ये करत आहेत. त्यांनी त्यांचे हे समाजकार्य असेच प्रामाणिकपणे पुढेही करावे, याच सदीच्छा आणि त्यांना त्यांच्या निस्वार्थी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा…

-अविनाश महाडिक, सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *