महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प (सातारा जिल्हा) कार्यप्रणाली शुभारंभ संपन्न झाला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प (सातारा जिल्हा)
कार्यप्रणाली शुभारंभ संपन्न झाला

३६ जिल्ह्यामधून सातारा जिल्ह्याची निवड झाली. सातारा पोलीस हे आजपर्यंत उत्तम कामगिरी करत आले आहेतच. पण या प्रकल्पामुळे माता-भगिनींसाठी आता अधिक सुरक्षित तटबंदी उभारली गेली आहे.
मा. ना. श्री. शंभूराजे देसाई साहेब – गृहराज्यमंत्री (ग्रामीण) यांनी या कार्यक्रमामध्ये स्वागतपर भाषण केले. तर मा. श्रीमती आंचाल दलाल मॅडम (सहाय्यक पोलीस अधीक्षक सातारा उपविभाग) यांनी या प्रकल्पाची माहिती देताना काही गोष्टी नमूद केले त्या पुढीलप्रमाणे –
१)स्वसंरक्षण
२)कौटुंबिक हिंसाचार
३) समुपदेशन कार्यपद्धती (गाव पातळीवरील व्यक्ती + महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन + सामाजिक संस्था).
४) बालकांचे हक्क व सुरक्षा प्रशिक्षण (ऑनलाइन मार्गदर्शन).
५) गुन्ह्यामध्ये बळी पडलेल्या पीडित महिला व बालकांना आर्थिक मदत.
६) इन्स्टाग्राम रीलस च्या माध्यमातून जनजागृती.
या स्वरूपात या प्रकल्पाचे काम राहील.
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या प्रकल्पाला ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.
मा. अजयकुमार बन्सल (पोलीस अधीक्षक सातारा) यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्यावर भरोसा सेल सातारा यांनी सोपवलेली जबादारी आम्ही नक्कीच पार पाडु. लॉकडाउन च्या काळात कौटुंबिक हिंसाचाराची जी प्रकरणे प्रतिष्ठान मार्फत सोडवली गेली त्यात आम्हाला जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा API मा. माधुरी जाधव मॅडम आणि त्यांची टीम ने खूप मदत केली. आज जाधव मॅडम यांची बदली झाली पण त्यांची आठवण आली.
अतिशय उत्तम प्रकल्प असून येत्या काळात महिलांच्या समस्या कमी होतील याची खात्री आहे.

या कार्यक्रमासाठी मला मा. धीरज पाटील साहेब (अप्पर पोलीस अधीक्षक सातारा) आणि मा. अनीता मेनकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक सातारा) यांनी आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. हा मान माझा नसून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य सर्वांगीन कार्याचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *