रस्त्यावर खड्डे, कार्यकर्त्याचा पाठपुरावा आणि काम फत्ते
सातारा/ प्रतिनिधी
नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या सातारा ते लोणंद रस्तावर काही ठिकाणी खड्डे पडले. हि बाब सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोटोसह माहिती कळवली.याची तातडीने दखल घेत सदरचे खड्डे तत्काळ योग्य पद्धतीने भरले.सामाजिक परिस्थितीची आणि सार्वजनिक मालमत्तेबाबत दक्ष नागरिकांच्या केलेल्या सुचनांचा आदर करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्य दक्षची चर्चा वडूथ,शिवथर परिसरात होऊ लागली आहे.
सातारा – सातारा ते लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डी या राजमार्गावर आरफळ फाटा येथे जरंडेश्वर ढाब्याजवळ कि.मी.३६/८००अंतरावर पाईपलाईन चर काढला होता. त्यामुळे त्याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून रस्ता खचत चालला होता.तर काही दिवसापूर्वीच या राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. रस्ता खचत चालला आहे. याबाबत वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हि बाब निदर्शनास आणून देत काम करण्यासाठी सतत पाठपुरावा केला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दक्ष नागरिकाच्या सुचनांची दखल घेतली. ज्या ठिकाणी रस्ता खचत चालला होता, त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम करत खराब झालेला रस्ता पुन्हा चांगला केला. यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. सदर खड्ड्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असते.
याबद्दल सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांच्या सह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.












Leave a Reply