सातारचे जिल्हाधिकारी जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तर देतील का की फक्त ज्युडीशियल प्रॉवरच दाखवणार ? श्री. छ. मा. खा. उदयनराजे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारचे जिल्हाधिकारी जनतेला पडलेल्या प्रश्नांची उत्तर देतील का की फक्त ज्युडीशियल प्रॉवरच दाखवणार.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरीकांची फार मोठया प्रमाणात मानसिक, शारीरीक,आर्थिक आणि सामाजिक हानी झाली आहे आणि सुरुच आहे. कोरोना हे फार मोठ षडयंत्र असल्याचेही राज्यातील आणि देशातील नागरीकांच्या मनामध्ये अधिकाधिक ठसले जात आहे. रेमडिसिन्हर या औषधांचर बंदी असताना, ती कोरोनाचर अँटी व्हायरल म्हणून वापरण्यास कुणी आणि कोणत्या आधारे परवानगी दिली आहे. रेमडिसिजर किंवा स्टेरॉईडस मुळे म्युकर मॉयकोसिस रोगाचा निष्कर्ष निघत असताना, ही औषधे वापरलीच का असे गंभीर प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये आहेत. त्याकरीता लोकसेवक असलेल्या मा.जिल्हाधिकारी यांनी खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी लोकहिताची मागणी करीत २५ प्रश्नांची
प्रश्नावली जिल्हाधिकारी,सातारा यांचेकडे दिली असून, उत्तरे देणार का ज्युडिशियल पॉवर सुरुच ठेवणार.
खालील प्रश्नांची उत्तरे मा.जिल्हाधिकारीसाहेब यांना स्वतंत्र पत्राद्वारे विचारलेली आहेत.

कोव्हिड -१९ च्या निमित्ताने सामान्य जनतेच्या मनामध्ये असलेले प्रश्न.

प्रश्न १) कोविड -१९ या रोगावर नेमके औषध उपलब्ध आहे का? पैकी आपल्याकडे कोणते उपलब्ध आहे..

प्रश्न २) कोविड -१९ मेडिकेशन प्रोटोकॉलद्वारे नेमके औषध दिसत नाही,मग गेल्या वर्षापासून ते सध्या उपचारार्थ असणा-या रुग्णांवर कोणत्या औषधांचा वापर होत आहे!

प्रश्न ३) कोविड-१९ मेडिकेशन प्रोटोकॉल (उपचारपध्दती) मध्ये विविध औषधे समाविष्ट
करण्यात आली त्यांचा काळाबाजार झाला व नंतर ती औषधे, इंजेक्शन बंद करण्यात का आली.

प्रश्न ४) कोव्हिड-१९ मयत व्यक्तीची ऍटॉप्सी का केली जात नाही.

प्रश्न ५) आरटीपीसीआर व रॅट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याची वैधता कशी
ठवण्यात येते. एकाच व्यक्तीच्या वेगवेगळया तपासण्यांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष कसे येतात?

प्रश्न ६) कोविड-१९ यंदा लॉकडाऊन सुरु असतानाही महिनाभर संख्या कशी वाढत
राहीली. सातारा जिल्हयाचा डाउनफॉल उशिरा का आला ?

प्रश्न ७) कोव्हिट-१९ लॉकडाउन असताना रुग्ण संख्या वाढण्याची कारणे काय ?

प्रश्न ८) कोविड -१९ रुग्णसंख्येच्या आकडेवारीमध्ये घोळ आणि घोटाळ्यामुळे रुग्णसंख्या वाढत होती का ?

प्रश्न ९) कोविड-१९ १५ एप्रिल २०२१ नंतर ज्या त्या दिवशी ते ते बाधित/निगेटीव रिपोर्ट
अपलोड होत होते का, जुन २०२१ पर्यंत रिपोर्ट अपलोड करण्यात पेन्डन्सी आली तर एकूण
पेन्डन्सीचा आकडा काय ?

प्रश्न १०) कोव्हिड १९ रिपोर्टचा घोळ आणि घोटाळा झाला आहे तर त्याला दोषी
कोण व दोषींवर कारवाई काय केली ?

प्रश्न ११) आकडेवारीत घोळ आणि घोटाळा झाल्याने सातारा जिल्हा रेडझोन मध्ये
जाण्यास कारणीभूत ठरला, याची जबाबदारी निश्चित केली आहे का यात कोणाकोणावर
काय कारवाई केली ?

प्रश्न १२) कोविड -१९ आयसीएमआर व केंद्रशासनाच्या नियमाप्रमाणे सातारा जिल्हयात कॉर्टेक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग का झाले नाही?

प्रश्न १३) कोव्हिड-१९ म्युकरमायकोसिस हा रोग कश्यामुळे समोर आला. त्याची कारणे काय, तिसरी लाट येणार आहे असे जिल्हाप्रशासन व राज्यसरकार म्हणत आहे त्याला आधार काय ?

प्रश्न १४) कोविड -१९ जंबो कोव्हिड सेन्टरचे व्यवस्थापन कोणाचे आहे. तेथील नियुक्त तज्ञांची संपूर्ण नाव व फोन नंबरसह विस्तृत माहीतीची यादी द्यावी.

प्रश्न १५) कोविड -१९ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती गठन केल्याचे आदेश प्रत द्यावी.
प्रश्न १६) कोविड -१९ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या आयोजित बैठकांचे
उपस्थितांच्या उपस्थिती पत्रकावरील स्वाक्ष-यांसह सर्व इतिवृत्त द्यावे.

प्रश्न १७) कोविड – १९ कडक लॉकडाऊन असताना, रस्त्यावर फिरणारी लोक फिरत होती तर ती कोरोनामुळे मयत का झाली नाहीत?

प्रश्न १८) कोविड -१९ घरातुन बाहेर न पडणा-या व्यक्तीला घरी कोरोना होतो व त्या व्यक्तीचे हॉस्पिटलाझेशन झाल्यावरच मृत्यू होत आहेत याची कारणे काय ?

प्रश्न १९) कोविड -१९ अंत्यसंस्काराला २० लोकांची मर्यादा घालताना त्यामधील तार्किक-वैधानिक वैद्यकिय साधार कारण कोणते व यामागील संशोधन कारण काय?

प्रश्न २०) कोविड -१९ शहर किंवा गावातील मुख्य ठिकाणी, चौका-चौकात १५-२० पोलिस,
नागरीकांना विचारणा करतात. गाडयांची काचा, टायरवर काठया मारतात, चाव्या काढून
घेतात, गचांडीधरून कोरोना टेस्ट करतात, हे सारे असंविधानिक वर्तन कोणत्या नियमाखाली
सुरु आहे.?

प्रश्न २१) आपल्या आदेशात आठवडयातील शेवटी शनिवार-रविवार दोन दिवसांचा, कडक लॉकडावून आहे. त्याला कोणता तर्क व आधार लावला आहे ?

प्रश्न २२) आपल्या आदेशात शेतात जाण्याची वेळ दुपारी ४ पर्यंत ठेवली आहे. पावसाळ्यापुर्वी मशागतीला लावलेले बंधन कोणत्या नियमावर आधारित आहे ?

प्रश्न २३) जगाचा पोशिंदा व कृषीप्रधान देशाचा पालनपोषक बळीराजाला वीजेच्या
कालावधीत शेतातील कामे करायला हरकत करण्या मागची तर्कसंगती कोणती ?

प्रश्न २४) आपले असे आदेश कोव्हिड प्रतिबंधात्मक न वाटता, सामान्य जनतेचा
छलकपट करण्याचा तुघलकी कारभाराचा आहे असे सामान्यांना वाटते यावर आपले
स्पष्टीकरण द्यावे.

प्रश्न २५) आर्युवेदिक संस्कृतीचा मुलाधार असलेल्या भारतभुमीत आर्युवेदिक उपचार
पध्दतीला शासन अधिकृतता का देत नाही ?

सदरचे प्रश्न सर्वसामान्य मध्यवर्गीय, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अश्या सर्वांच्याकडून, आम्ही जेव्हा त्यांच्याशी काही इतर कामानिमित्त भेटलो-बोललो त्यावेळी त्यांनी विचारलेली आहेत. आम्हालाही लोकहिताकरीता त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची इच्छा झाल्याने, सदरचे प्रश्न आपणास विचारीत आहोत,
त्याची जास्तीत जास्त समर्पक-काही ठिकाणी विस्तृत उत्तरे जनता जनार्दनाच्या हितासाठी मिळावीत अशी
विनंती सूचना सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *