ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून देनेबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन . *करण सुनील पोरे*प्रदेशउपाघ्यक्षभाजपा( ओबीसी मोर्चा )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी

माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, आपण आपला परिवार खुशाल असेल अशी आशा करतो. काही दिवसांपूर्वी मानानीयसर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण, यासंदर्भातील आपल्या सरकारचीपुनर्विचार याचिका फेटाळली. आपणास देखील या गोष्टीची माहिती आहेच. परंतु, आपण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीत. खरतर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या हातात ठोस काही असणे आवश्यक असते, आपल्याकडे ते नाही! म्हणूनच आपण प्रतिक्रिया देणेटाळले.

दिनांक १२ डिसेंबर, २०१९ या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भाने काही आदेशदिले होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला बजावून सांगितले होते की, “लवकरात लवकरराज्य मागासवर्गीय आयोगाचेगठन करावे. राज्यातील ओबीसी समाजाचा ‘Empirical Data’ जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा.” न्यायालयाच्या याआदेशाला जवळपास पंधरा महिने झाले मात्र आजूनही आपण साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही. ही अत्यंतगंभीर बाब आहे.

१२ डिसेंबरला नंतर देखील आपल्या सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जवळपास दहा ते बारा तारखा दिल्या! एकही तारखेलाआपले सरकार न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पूर्तता करून न्यायालयात हजार राहिले नाही. आणि तुम्ही देखील या प्रकरणात स्वतःजातीने लक्ष घातले नाही.

गेल्या पंधरा महिन्यात, आमचे नेते विधानसभेचे विरोधीपक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास पाच ते सात वेळापत्राद्वारे आपल्याला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसीमोर्चा च्या वतीने अनेक वेळा आम्ही आपणास पत्र दिले. आमच्या एकही पत्रावर आपल्याकडून उत्तर आले नाही. आपल्याकडून त्यावरकोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही.

आपल्याला विरोधकांची जराही किंमत नाहीच. मात्र ओबीसी समाजाला देखील तुम्ही क्षुल्लक समजत आहात! एवढेच नाही तरआपल्याकडून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वारंवार अवमान केला गेला. याचाच फटका ओबीसी समाजाला बसला आहे. गेली पंधरा महिने सरकार फक्त कोर्टात जाऊन पुढची तारीख मागत होते.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आपल्याला चेतावणी देत आहे! लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा! तसे झाले नाही तरआमच्याकडे आंदोलना शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच राहू.

आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही.

धन्यवाद…!

योगेश पुंडलिक टिळेकर,

प्रदेशाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा.

*करण सुनील पोरे*

प्रदेश उपाघ्यक्षभाजपा( ओबीसी मोर्चा )

महाराष्ट्र राज्य तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी

या वेळी सोबत भजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे पश्चिम महाराष्ट्र सचिव नंदकुमार यादव पदाधिकारी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *