श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्या मूळे च धोकादायक ” एस ‘ वळण होणार इतिहासजमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्या मूळे धोकादायकएसवळण होणार इतिहासजमा

#Pune #Satara #NH4

खंडाळा (जि. सातारा) : पुणेसातारा महामार्गावरील (pune satara national highway) येजा करण्यासाठी दोन्ही खंबाटकी बोगदा(khambatki tunnel) रस्त्याचे काम लॉकडाउनच्या (lockdown) काळातही जोमाने सुरू आहे. पुण्याहून साताऱ्याला येजाकरण्यासाठी खंबाटकी बोगद्यातून जावे लागणार असल्याने सध्याचा खंबाटकी घाट रस्ता इतिहासजमा होणार आहे. या बोगद्यामुळेपुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकूण आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. (marathi-news-less-time-travelling-pune-satara-eight-kilometers-khambatki-ghat)

खंबाटकी घाटात धोकादायक इंग्रजीएसआकाराच्या (s-turn) तीव्र उताराच्या वळणावर घाटरस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेहोते. या घटनेचे गांभीर्य पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे दोन बोगद्यांसह 6.46 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला 28 फेब्रुवारी 2019 ला मंजुरी देण्यात आली. या कामाचे 493 कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीनवर्षे सुरू राहणार असून 27 फेब्रुवारी 2022 ला बोगदा रस्त्याचे काम संपवण्याची मुदत आहे. जून 2022 ला हे काम सर्व काम संपून हारस्ता रहदारीसाठी सुरू होणार आहे.

हा एकूण 6.46 किलोमीटरचा हा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे 1.2 किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याच्या बाजूकडे जातानाबोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाण पूल असणार असून कॅनॉलपासून पारगावखंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंतभरावा रस्ता होणार आहे. यावेळी बेंगरुटवाडी अंबारवाडीपवारवाडीसाठी रस्ता असणार आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरत असलेला साताऱ्याहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणेबंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायकएसआकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे. पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी सध्यासुरू असलेला घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्तीकालीन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्यालासुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे गोल डिझाइन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाण पूलबनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

सध्या, कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्र प्रोजेक्‍टकडून सुरू असून एकूण 15 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशीमाहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

एकूण 6.46 किलोमीटरचा रस्ता दोन्ही बाजूकडे 1.2 किलोमीटरचा बोगदा कामाचे 493 कोटींचे बजेट 27 फेब्रुवारी 2022 पर्यंत कामसंपणार बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाण पूल धोकादायकएसवळणही होणार इतिहासजमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *