माण-खटाव प्रतिनिधी :
मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे गणेश काटकर यांच्या मातोश्री शोभा सुखदेव काटकर यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्या ५६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,सुन असा परिवार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडजल ता.माण येथे वास्तव्यास असणारे गणेश काटकर हे सामाजिक क्षेत्रात काम करत असतात तर त्यांचे बंधू जितेंद्र काटकर हे व्यवसायानिमित्त मुंबई स्थित असतात.
येरळवाडी ता.खटाव येथील माहेर असणाऱ्या शोभाकाकी सतत हसतमुख आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे पंचक्रोशीत सर्वांना परिचित होत्या. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.












Leave a Reply