राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा नैसर्गिक कि मानवनिर्मित ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील

राज्यात वाढता कोरोणोचा कहर पाहता सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय कोविड सेंटरसह खाजगी रुग्णालयात कुठेही ऑक्सिजन/वेंटीलेटर बेड शिल्लक नाहीत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना आता बेड शिल्लक नसल्याने यापुढील काळात उपचार मिळणेदेखील अशक्य होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

भरीस भर म्हणून रेमडीसीवीरचा तुटवडा

आज जिल्ह्यात कुठेही कोविड रुग्णांना दिले जाणारे रेमडीसीवीर इंजेक्शन कोणत्याही वितरकाकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येते आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रेमडीसीवीर इंजेक्शन वाटेल ती किंमत मोजून उपलब्ध करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसून येत आहेत. ८०० रु.किमतीचे इंजेक्शन ८००० रु. किंमतीलाही मिळत नसुन काही ठिकाणी अव्वाच्या सव्वा किंमतीने विकली जात असल्याची खात्रीलायक चर्चा आहे.

त्यामुळे हा तुटवडा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे त्याबाबत सामान्यजनांच्या मनात शंका आहे. तसेच त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक तसेच मा.जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालण्याची मागणी सर्वसामान्य लोकांकडून होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *