आ.शशिकांत शिंदे यांना गृहमंत्री करा, माणदेशी युवकांची मा.शरद पवारांकडे पत्राद्वारे मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील

राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानपरिषदेचे आमदार आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र शशिकांत शिंदे यांना गृहमंत्री करण्याची मागणी माणदेशातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्याने आणि आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे शशिकांत शिंदे यांची माणदेशी युवकांत मोठी क्रेझ आहे. आणि म्हणूनच ते जेव्हा जिल्ह्यात येत असतात तेव्हा त्यांच्या भोवती युवकांचा गराडा पहावयास मिळतो. त्यामुळे सहाजिकच युवकांना. ते आपल्या जवळचे वाटतात.

त्यामुळेच माणदेशातील युवकांनी थेट पवारसाहेबांकडे पत्र पाठवून त्या पत्रात आ. शशिकांत शिंदे यांना गृहमंत्री करण्याची केली आहे.

त्या पत्रात ” आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, आम्ही माणदेशातील युवक अतिशय नम्रपणे आपणास मागणी करतो की, स्व.आर.आर.पाटील यांच्यानंतर गृहमंत्री पदास योग्य न्याय द्यायचा असेल आणि समस्त माणदेशासह सातारा जिल्ह्यास सक्षम नेतृत्व द्यायचे असेल तर आक्रमक राष्ट्रवादी चेहरा परंतु तितकेच अभ्यासु सर्वसामान्य नेतृत्व असणाऱ्या शशिकांत शिंदे यांना गृहमंत्री करावे.”

अशा आशयाचे पत्र माण,खटाव, आटपाडी, सांगोला, जत,कवटेमहंकाळ, तासगाव,माळशिरस, कोरेगाव,फलटण येथील युवकांनी थेट पवारसाहेबांना पाठवले. त्यामध्ये गणेश काटकर, प्रमोद बागल, पै.सचिन चव्हाण, धनंजय माने, सोमनाथ यादव, किरण कदम,राज काटकर, संदीप नलावडे या युवकांनी थेट पवारसाहेबांना पाठवले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *