
संदीप पवार ,सातारा प्रतिनिधी ,
मो.7499853799.
सातारा प्रतिनिधी – महावितरण कंपनीने सध्या घबाडासाठी राज्यातील जनतेचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम अखंडितपणे सुरूकेले आहे. याला आमचा तीव्र विरोध असून याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. अशी तीव्र हाय होल्टेज प्रतिक्रिया व्यक्तकेली आहे वडूथ ,ता.जि.सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते व खासदार छत्रपती उद्यनराजे भोसले यांचे समर्थक मदन साबळे यांनी.
आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे लाँकडाऊनला .या काळात सर्व जनता हि घरातच बसून होती.सर्व काही एका झटक्यात थांबले होते. जशी जशी अचानक लाईट जाते तेव्हा सर्व काही जाग्यावर थांबते अगदीच तसे.
लाँकडाऊनमुळे आवक बंद झाली होती. आवकच अचानक बंद झाल्यामुळे सर्वांचीच आथिर्क परिस्थिती बिकट झाली होती. मोठमोठेकारखाने व शहरे बंद होती. याच काळात वीजेची मोठी बचत झाली होती. असे असताना राज्य सरकार व सरकारचे मंत्री म्हणतात वीजबिल थकबाकी आहे.
लाँकडाऊन काळातील मार्च ,एप्रिल व मे या तीन महिन्यातील वीज बिल माफ करणार असल्याचे कुणी सांगितले होते आठवते का तेबघा .पण डायरेक्ट वीज कनेक्शन तोडून वीज बिलाचा झटका जनतेला देणे बरोबर नाही.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हंटले जाते.येथील जनतेला म्हणजे जे धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त झाले आहेत त्यांनी आपले स्वतः चे घरदार ,गाव ,शेतजमीन सोडून पुनर्वसन स्विकारले आहे. त्यांना आजपर्यंत सरकारनेवेळेत वीज पुरवठा केला नाही. तसेच त्यांचे पुनर्वसन सुध्दा योग्य त्या पद्धतीने केलेले नाही. आजही त्यातील अनेकांच्या जीवनात अंधारच आहे. मात्र त्यांच्या त्यागामुळे राज्यात चांगला प्रकाश पडलेला आहे हे विसरून चालणार नाही.
बारामती ,नगर सारख्या भागात ठिकठिकाणी दिवसाढवळ्या उघडपणे वीज चोरी केली जाते. त्या ठिकाणी महावितरण कंपनी अशीकारवाई का करत नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री सुध्दा तिथे गप्प का बसतात. डोळे असूनसुद्धा त्यांना ते का दिसत नाही. मूग गिळून गप्पबसून चालणार नाही. आधी आपल्या बुडा खालचा अंधार बघायला पाहिजे. नाहीतर योग्य वेळी जनता तुम्हाला जोरका झटकादिल्याशिवाय गप्प बसणार नाही याची गंभीरपणे दखल घ्यावी.












Leave a Reply