राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाची लागण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाची लागण
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आता साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. यापूर्वी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मकरंद पाटील हे माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आहेत.मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार पाटील प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत मतदारसंघात संपर्क दौऱ्यावर होते. मार्च महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यातच सातारा जिल्ह्यात पहीला कोरोना बाधित रुग्ण खंडाळा येथे आढळून आला होता. त्यानंतर मतदार संघात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आ.पाटील प्रशासनाला सोबत घेऊन लोकांना सतर्क करत होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *