मराठा समाजाची एकही मागणी मान्य न करणारे मंत्री अशोक चव्हाण : गणेश काटकर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी :धनंजय माने-पाटील

दि.१३     मराठा समाज आपल्या न्याय हक्कसाठी रस्त्यांवर येत आहे या बाबत राज्यसरकार कोणतीही दखल घेत नाही. आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत पाटण तालुक्यातील युवक तसेच साष्टपिंपळगाव येथे मराठा समाज ठिय्या आंदोलन करत आहे. त्या ठिकाणच्या आंदोलनाची मागणी काय आहे या बाबत साधी विचारपूस सरकार मधील जबाबदार नेते करत नाही स्वतः उपसमिती चे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी अपयशी ठरले असून या पुढे उपसमिती चे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः कडे जबाबदारी घ्यावी व मराठा समाजावर गेल्या वर्षभर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक गणेश काटकर यांनी केली.

राज्यात काही लोकांशी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून बैठक घेत असतात. परंतु अश्या बैठकीतून आज पर्यन्त काहीही साध्य झालेले नाही. उलट सामान्य मराठा समाजाच्या हातात काहीही लागलेले नाही चर्चेला जाणारे समन्ववयक सुद्धा या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीवर नाराज असून सरकारने व्यापक चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे. स्वतः छत्रपती उदयनराजे महाराज या विषयावर बारकाईने लक्ष देत आहेत तरी सुद्धा सरकार टीका करण्यात व्यस्त दिसून येते आहे
मराठा समाज आरक्षण का मागतोय या बाबत सध्याच्या सरकारने विशेषतः काँग्रेस ने अभ्यास केला तर लक्षात येईल नक्की मराठा समाजावर अन्याय कोणी केला ,परंतु जे झाले ते झाले या पुढे सक्षम पणे या मुद्यावर काम करून मराठा समाजातील युवकांना न्याय दिला पाहिजे अन्यथा मराठा समाज वेगळ्या भूमिकेतून पुढे येईल आणि ही भूमिका कोणालाही परवडणारी नसेल म्हणून राज्य सरकारने कोणतीही सबब न सांगता मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असे गणेश काटकर लाईव्ह महाराष्ट्र 24 शी बोलताना म्हणाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *