माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
पानवण ता.माण याठिकाणाहुन दि.२७ रोजी अपहरण झालेले डॉ. नानासो शिंदे हे जरी मिळून आले असले तरी गेले चार दिवस रात्रंदिवस सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा,तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्ठेशनचे प्रभारी श्री.बाजीराव ढेकळे, तसेच दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री.राजकुमार भुजबळ,व वडुज पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. मालोजीराजे देशमुख यांचा संयुक्तरित्या युद्धपातळीवर तपास सुरू असुन लवकरच अंतिम निष्कर्ष समोर येण्याची अपेक्षा आहे.
तपासात स्थानिक गुन्हे शाखेची धडाडी
या तपासकामी गेले चार दिवस म्हसवड याठिकाणी तळ ठोकून असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, स.पो.नि. आंनदसिंग साबळे, पो.ह. तानाजी माने, सुधीर बनकर,अर्जुन शिरतोडे,गणेश कापरे,मयूर देशमुख,मोहसीन मोमीन,संकेत निकम
प्रविण कांबळे,प्रवीण पवार यांच्या टीमने अतिशय ताबडतोब तपास करत अपह्रत शिंंदेना ताब्यात घेेण्ययापाासुन तेे आतापर्यंत अतिशय नियोजनबद्ध तपास करत बनाव ? की खरोखर अपहरण? या निष्कर्षाप्रत स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहचली असल्यााबाबतची माहीती स्थानिक गुन्हेे शाखेचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 शीी बोलताना दिली.
निष्कर्षाची नागरिकांना उत्सुकता
अपहरण नाट्याबाबत खरोखरच अपहरण की बनाव याबाबतची उत्सुकता जिल्ह्यासह म्हसवड परिसरातील नागरिकांना लागुन राहीली असुन अंतिम निर्णय पोलीस कधी जाहीर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Leave a Reply