श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचा वाढदिवस राजमातांनी केला साजरा

सातारा : राजमाता कल्पनाराजे भोसले यांना केक भरवताना गीतांजली कदम , शेजारी रंजना रावत , सुनील काटकर आदी . ( live Maharashtra 24) श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचा वाढदिवस राजमातांनी केला साजरा

सातारा , ता . २४ : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज त्यांच्या जलमंदिर या निवासस्थानी निवडक सहकाऱ्यांसमवेतराजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केक कापून साजरा केला . या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर , माजीनगराध्यक्षा रंजना रावत , गीतांजली कदम , धनंजय अहिरे , संगीता गुरव , तसेच खासदार उदयनराजे यांचे मोजके

निकटवर्तीय उपस्थित होते . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी जलमंदिर येथेवाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना समर्थकांना केल्या होत्या . या सूचना करतानाच ते स्वत : बाहेरगावी गेले . यामुळे आज सकाळी राजमाता कल्पनाराजे यांच्या उपस्थितीत निवडक सहकाऱ्यांच्या मदतीने उदयनराजेंचावाढदिवसाचा केक कापण्यात आला .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *