माण-खटाव प्रतिनिधी:धनंजय माने-पाटील
आयुष्यामध्ये आपण कुणाच्या सहवासात आहात त्याच्यावर आपल्या विचाराची आणि प्रगतीची जडणघडण होत असते असे व्यक्तिमत्त्व श्री प्रभाकर कृष्णाजी देशमुख साहेब –
एक उच्च शिक्षित, विनयशील, उत्तम प्रशासक, चारित्र्यसंपन्न. ज्यांचे शिक्षण : एम. एससी (अॅग्री) कृषी शास्त्र आणि पीक विज्ञान
रौप्यपदक , प्रथम श्रेणी , कृषी महाविद्यालय , पुणे पूर्ण करून प्रशासकीय जीवनाची सुरुवात केली आणि उपजिल्हाधिकारी ते
सचिव : मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य,
,अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC मुंबई
,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर, जिल्हाधिकारी पुणे २००४-२००८, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य
विभागीय आयुक्त, पुणे आणि मुंबई प्रशासकीय सेवा करत असताना देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर काही पुरस्कारांनी ज्यांची दखल घेतली ज्यांना 1.उद्योग_मित्र_पुरस्कार :
शाश्वत आद्योगिक विकासासाठी २००५ साली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज कडून उद्योग मित्र पुरस्काराने सन्मानित,
२.एस_एच_जी_बँक_लिंकेज_प्रोग्रॅम_पुरस्कार :
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) मार्फत महाराष्ट्र राज्यातील सूक्ष्म वित्त क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल २००६-०७ साली एस एच जी बँक लिंकेज प्रोग्रॅम पुरस्काराने सन्मानित.
३. – पंतप्रधान_पुरस्कार_१ :
कोल्हापूर जिल्ह्यातील राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमासाठी २००६-०७ साली लोकप्रशासनातील सर्वोत्कृष्ठ नेतृत्व योगदानाबद्दल २००८ साली तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या हस्ते पंतप्रधान पुरस्काराने नवी दिल्ली येथे सन्मान
4. शाइनिंग_लिडरशीप_पुरस्कार :
समूहाद्वारे सेंद्रिय शेतीच्या यशस्वी प्रयोगासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन चीन मधील सुप्रीम मास्टर चिंग हाय इंटरनॅशनल असोसिएशनकडून शाइनिंग लीडरशीप पुरस्काराने २००९ साली सन्मानित.
५ -सायटेशन_ऑफ_ऑनर_पुरस्कार :
टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टीयम पुणे संस्थे मार्फत प्रशासनातील उत्तम कामगीरी बद्दल २००९ साली प्रशंसा पत्र आणि सायटेशन ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित.
६ – कृषी_कर्मण_पुरस्कार :
देशाच्या मध्य पश्चिम विभागातील कडधान्य उत्पादनात उत्तम कामगिरी केल्याबद्दल सन २०१०-११ साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते कृषी कर्मण पुरस्कार.
७ -नॅशनल_अवॉर्ड_फॉर_इ_गव्हर्नन्स :
पिकांवरील कीड नियंत्रण या सल्ला योजनेत माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर केल्याबद्दल केंद्र शासनाचा
नॅशनल अवॉर्ड फॉर इ गव्हर्नन्स या पुरस्काराने २०११-१२ ला सुवर्णपदकाने सन्मान.
८ – समाजरत्न_पुरस्कार :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या मार्फत प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल २०११ साली सन्मान पत्र आणि समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.
९ – जी_फाईल्स_गव्हर्नन्स_अवॉर्ड :
शेती विकास व इ गव्हर्नन्स क्षेत्रातील प्रयोगासाठी २८ नोव्हेंबर २०१५ रोजी जी फाईल्स अवॉर्ड हा एक्सलंट कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड ने सन्मानित.
१० – पंतप्रधान_पुरस्कार_२ :
पिकाचे नुकसान, कीड, रोग निदान या संदर्भात कृषी सल्ला सेवा योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल २१ एप्रिल २०१५ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुरस्कार…………… आज देशमुख साहेब प्रशासकीय सेवेनंतर श्री शरद पवार साहेब यांच्या विचाराचा सामाजिक सेवेचा वसा हातात घेऊन
माण- खटाव साठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व त्याची दखल घेऊन माण-खटाव जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 88500 मते देऊन त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमाची पोचपावती दिली आज सुद्धा देशमुख साहेब प्रचंड ऊर्जा घेऊन राहिलेला आयुष्य महाराजांच्या सेवेसाठी म्हणून सदस्य रायगड विकास प्राधिकरण म्हणून काम करत आहेत त्याच बरोबर माण- खटाव या भागातील विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट आणि प्रशासकीय सेवेत जाता यावं म्हणून मुख्य समन्वयक : राजर्षी शाहू अकॅडमी , पुणे पार पाडत आहेत तसेच शिक्षणाचा प्रचंड जिव्हाळा असल्यामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी सुद्धा जबाबदारी पार पाडत आहेत …. माननीय श्री.. प्रभाकर देशमुख साहेब देशातील एकमेव प्रशासकीय व्यक्तिमत्व दोन वेळा पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित आशा व्यक्तीमत्वाला पुन्हा एकदा लाईव्ह महाराष्ट्र 24 कडुुन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
(शब्द संकलन :: गणेश नलावडे)












Leave a Reply