राज्यस्तरीय ” शिवगानस्पर्धा 2021 ” मुळे विविध गीतांमधून , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श , लोकल्याणाचं उत्तुंग कार्यनवीन पिढीसमोर येईल , स्फूर्ति मिळेल असा विश्वास , स्पर्धेचं पोस्टर प्रकाशन करताना मा.खासदार छ.श्रीमंत उदयनराजे भोसले यांनीव्यक्त केला . सर्व वयोगटातील तमाम शिवप्रेमी जनतेनं स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं , असं आवाहनही त्यांनी आज केलं.छत्रपतीराजमाता श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी शिवगान स्पर्धेला आशीर्वाद दिले आहेत . भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशयांच्यावतीनं आयोजित * ” शिवगान स्पर्धा 2021 * _ या स्पर्धेच्या पोस्टरचं प्रकाशन मा.खासदार छ.श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याहस्ते शुक्रवारी राजवाड्यात झालं . या कार्यक्रमाला भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक ॲड.शैलेश गोजमगुंडे , प्रदेशसहसंयोजक उमेश घळसासी , प्रदेश सहसंयोजक आणि ख्यातनाम नृत्यदिग्दर्शक पंकज चव्हाण , शिरीष चिटणीस , सुनिल काटकर , वैशाली राजेघाडगे , अतुल पाटोळे , अदित्य शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते .
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश आयोजित शिवगान स्पर्धा दोन स्तरांवर होणार असून आद्य नाट्यशास्त्रकार प.पू. भरतमुनीजयंती दिवशी दि . 9 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर होईल . राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा सातारा इथल्या * अजिंक्य तारा * गडावरछत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी 19 फेब्रुवारी रोजी होईल . ही स्पर्धा विनाशुल्क असून अधिक माहितीसाठी सातारा जिल्हास्पर्धा समन्वयक वैशाली राजेघाडगे यांच्याशी 9822090093 संपर्क साधावा , असं आवाहन प्रदेश सहसंयोजक पंकज चव्हाण यांनीकेलं आहे .












Leave a Reply