परिसरातील वाढत्या चो-यांंमुळे म्हसवड पोलीस स्ठेशन अलर्ट मोडवर !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी: धनंजय माने-पाटील

(दि.१३)  म्हसवड पोलीस स्ठेशन हद्दीतील पुकळेवाडी,कुकुडवाड, कारखेल,म्हसवड याठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे परिसरात खळबळ माजली असुन वाढत्या चो-यांंमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

याबाबत म्हसवड आणि म्हसवड पोलिस स्ठेशन हद्दीतील गावांमध्ये गेल्या तीन दिवसांत झालेल्या घरफोड्यांमुळे म्हसवड पोलीसांची डोकेदुखी वाढली असुन, आधीच ग्रामपंचायत निवडणुकीत बंदोबस्त तसेच इतर कामात व्यस्त असणाऱ्या पोलीसांंवर घरफोडीच्या सत्रामुळे ताण वाढला असुन दि.१५ रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याबरोबरच चोरट्यांना जेरबंद करुन घरफोड्या रोखण्याचे असे दुहेरी आव्हान पोलीसांसमोर असणार आहे.

त्याअनुषंगाने संपूर्ण पोलीस स्ठेशनच अलर्ट मोडवर असल्याची माहिती स.पो.नि.बाजीराव ढेकळे यांनी दिली. त्याचबरोबर कुकुडवाड, पुकळेवाडी आणि इतरत्र झालेल्या चो-यांंचा युद्धपातळीवर तपास सुरू असुन लवकरच चोरांना जेरबंद करु असा विश्वास स.पो.नि.बाजीराव ढेकळे यांनी व्यक्त केला.

स.पो.नि.बाजीराव ढेकळे एक्शन मोडमध्ये

याबाबत म्हसवड पोलिस ठाण्याचे प्रभारी स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांच्याशी संपर्क साधला असता, पोलीस स्ठेशन हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटलांना सतर्क राहण्याबरोबर ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने रात्रगस्त वाढवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पोलीसांचे रात्रगस्त वाढवण्यात आले आहेत. तसेच रात्रीअपरात्री कुठेही संशयास्पद हालचाल किंवा संशयित अनोळखी व्यक्ती आढळल्यास म्हसवड पोलीस स्ठेशनशी संपर्क करण्याचे आवाहन स.पो.नि.बाजीराव ढेकळे यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 शी बोलताना सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *