सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ९८ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या. या सर्व ग्रामपंचायतींसाठी शासन स्तरावर जास्तीत जास्त निधी खेचून आणत गावचा सर्वसमावेशक विकास केला जाईल अशी खात्री आम्ही देतो.
या सर्व गावांतील ग्रामस्थांनी घेतलेल्या उस्फुर्त निर्णयावर आम्ही मनस्वी आनंदी आहोत तसेच सर्वांचे खूप खूप अभिनंदन. हीच एकजूट ग्रामविकासाच्या कामात पुढेही आपण सर्व दाखवाल अशी आम्हास खात्री आहे आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.
ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देऊन मोठ्या प्रमाणात विकास केला गेला पाहिजे. ग्रामीण जनतेला विकासाच्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न या माध्यमातून केले जातील. गावांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात पण सर्वसामान्यांचा सहभाग आणि सहकार्याने त्या राबवल्या गेल्या तर आवश्यक बदल घडून ग्रामस्थांचे जीवनमान उंचावेल. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ यांनी एकमेकांशी संवाद साधला तर त्यातून गावचा सर्वांगीण विकास नक्कीच होईल. गावांचा सर्वांगीण विकास आणि ग्रामस्थांमध्ये समाधान निर्माण करणे हे ग्रामपंचायतींच्या लोकप्रतिनिधींच्या हाती आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपले कर्तव्य समजून गावासाठी काम केलं पाहिजे. त्याचबरोबर बदलत्या युगात ग्रामस्थांनी पण आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपल्या गावात विकासाचा पॅटर्न राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्वांनी एकजुटीने निर्धार केल्यास गावचा कायापालट नक्कीच होऊ शकतो.
राजकारण म्हणजेच समाजकारण . श्रीमंत खा. उदयनराजें












Leave a Reply