निवडणूक काळात पोलीस पाटलांनी सतर्क रहावे : सपोनि बाजीराव ढेकळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्याने आज दि.५ रोजी कायदा सुव्यवस्था राखणे तसेच आवश्यक खबरदारी घेण्याच्या संदर्भात म्हसवड पोलीस स्ठेशन येथे पोलीस पाटलांची बैठक सपोनि बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी सपोनि बाजीराव ढेकळे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत म्हसवड पोलीस स्ठेशन हद्दीतील तब्बल ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. परंतु उर्वरित २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यातील बर्याचशा ग्रामपंचायती संवेदनशील, अतिसंवेदनशील आहेत.

त्याअनुषंगाने निवडणूक काळात पोलीस पाटलांनी कोणत्या दक्षता घ्यावी, तसेच आपापल्या गावातील कायदा सुव्यवस्था कशी अबाधित राहील, त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडु न देता निर्भयपणे  निवडणुका पार पडण्यासाठी आवश्यक त्या सुचना म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी या नात्याने सपोनि ढेकळे यांच्याकडून करण्यात आल्या.

गुंडगिरी दडपशाहीला थारा नाही

निवडणूक काळात कोणी गुंडगिरी, दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही. तसे कोणी आढळल्यास योग्य तो बंदोबस्त केला जाईल. तसेच पोलीस पाटलांनीही निपक्षपाती काम करावे आणि कोणी दबाव, अडथळा करत असेल तर माझ्या निदर्शनास आणून द्यावे, माझ्यासह संपूर्ण पोलीस दल पोलीस पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन सपोनि श्री.बाजीराव ढेकळे यांनी केले.

बैठकीसाठी सर्व पोलीस पाटील हजर होते. बैठकीचे नियोजन दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या आदेशानुसार, म्हसवड पोलीस स्ठेशनचे प्रभारी सपोनि बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनखाली, म्हसवड पोलीस स्ठेशनचे गोपनीय अभिजित भादुले यांंनी केले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *