*सातारा येथील सच्चा पोलीस मित्राचे सर्व स्तरातून होत आहे कौतूक राज्याचे गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन केले कौतूक* …
पोलीस मित्र संकल्पना राज्यात बंद होण्याच्या मार्गावर असतानां
सातारा येथील प्रसिद्ध पोलीस मित्र श्री.उदय आठल्ये यांच्या प्रामाणिक कार्यामुळे सातारमध्ये पोलीस मित्राने ही संकल्पना अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे …
उदय आठल्ये हे नेहमी पोलीसांच्या अडी अडचणी समजून घेत असतात व हे करत असतांना त्यांनी.पोलीस वसाहत रस्त्याचे काम मार्गे लावले. व आपल्या पोलीस बांधवाना चांगला रस्ता मिळवून दिला .. गतवर्षी पूरस्थिती निर्माण झाली असता 275 नवीन साडी पाठवण्यात आली .त्याच वेळेस त्यांनी आनेवाडी टोल नाका येथे चहा पाणी नाष्त्याची व्यवस्था देखील केली होती..
हे सगळे करत असतानां कोरोनाचा काळ आला या वेळी पोलीस,बांधव रस्त्यावर उभे आहेत घरादाराची पर्वा न करता ते आले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या साठी प्रत्येक लाँगडाऊन ला श्री. उदय आठल्ये यांच्या वतीने चहा पाणी नाष्ता याचे वाटप भरपूर प्रमाणात केले .. त्या नंतर पोलीस बांधवानां सूमारे 15 कँन सँनिटायझर वाटप केले. कोरोनाच्या काळात आपला वाढदिवस आला असतानां श्री. उदय आठल्ये यांनी आधी खाकी मग बाकी. या उक्ती प्रमाणे सूमारे 35 पोलीस अधिकाऱ्यांना कोविड योद्धा पुरस्कार सन्मान देऊन आपला वाढदिवस साजरा केला .. पोलीसांचे कौतूक व पोलीसांच्या चांगल्या कामगिरी जनसामान्य पर्यंतं पोहोच करणे हा,उदय आठल्ये यांचा हेतू असतो …या प्रामाणिकपणा,मुळे अनेक अधिकारी वर्ग देखील.प्रभावित झाला आहे …काही दिवसापूर्वी अपर पोलीस अधीक्षक डाँ.श्री.दत्ताराम राठोड यांनी शिक्षण क्षेत्रातील पी.एच डि व त्याच सोबत सूमारे 12 पदव्या प्राप्त केल्या बद्दल त्यांच्या निवासस्थानी जाऊन यथोचित सन्मान केला.या सत्कारामुळे डाँ.राठोड खुप भारावून गेले होते… अशा या सच्चा पोलीस,मित्राला भावी वाटचालीस,खूप खूप शूभेच्छा .पोलीसांच्या साठी असेच सामाजिक कार्य घडत राहो ….












Leave a Reply