*साता-याचा तारा आणि पोलीसाची वर्दी कार्याची दर्दी असलेले प्रभावी व्यक्तिमत्व श्री.उदय आठल्ये*
जनतेच्या सहभागा शिवाय पोलिसांना आपले काम करणे शक्य नाही, म्हणुन जनतेच्या सहभागा शिवाय समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे पोलिसांनी
शक्य नाही, जनते मधुन जबाबदार आणि विश्वासू पोलीस मित्र तयार झाल्या शिवाय शेवटच्या घटका पर्यंत पोलीस पोहचू शकत नाही, कारण पोलीस या यंत्रणे विषयी लोकांच्या मनात ब्रिटीश काळा पासून जो दुरावा निर्माण गैरसमज पसरला आहे तो कमी करण्यासाठी पोलीस मित्राची फार मदत होत असते. पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस मित्र ही संकल्पना राबवली जात असून ती वृद्धिंगत होण्याची नितांत गरज भासत आहे. कारण बरेच पोलीस मित्र स्वार्थी व वादग्रस्त निघत असल्याने पोलीस मित्र संकल्पना बंद होण्याआधी आपल्या वर्दीशी प्रामाणिक इमान कार्याशी दर्दी असलेले
एक प्रभावी पोलीस अधिकारीच पोलीस मित्र म्हणून समोर आला आहे त्यांचे नाव आहे उदय आठल्ये …
अल्पावधीतच साता-याचा तारा म्हणून नाव लौकिकास साजेशे असे कार्य उभे केले असून अन्यायाला वाचा फोडून योग्य न्याय देवून म्हणून आपल्या कार्याप्रती, राष्ट्राप्रती एकनिष्ठ राहणारे साताऱ्याचे खरे पोलीस मित्र उदय आठ्यल्ये यांनी साताऱ्यासह
संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. या पोलिसाने पोलीस मित्र संघटनेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात सक्षम करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असून चांगल्या अनुभवी
प्रामाणिक लोकाचे जाळे निर्माण करण्यास त्यांना यश देखील मिळत आहे . बेकायदेशीर कामांना चाप लावण्यासाठी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग देखील त्यांच्या कार्याने प्रभावीत झाले.
सातारा जिल्ह्यातील आरळे येथील पोलीस मित्र उदय आठल्ये हे
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पोलिसांना मदत व्हावी म्हणून पोलीस मित्र ही संकल्पना राबवून
पोलिस मित्रांना चांगल्या प्रकारची मदत करतात. गणपती, नवरात्र उत्सव,
दिवाळी, मोहरम,विविध जयंती पुण्यतिथी निमित्ताने ते पोलीस मित्र म्हणून पुढाकार घेत असतात. 2020 मध्ये कोरोना सारखी महामारीची लागण झाली. पोलीस मित्र श्री. उदय आठल्ये यांनी वाढदिवसाला केक न कापता एक वेगळा उपक्रम राबवला तो म्हणजे आपल्या पोलीस अधिकारी आहेत त्यांना कोविड योद्धा उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करायचे असे ठरवले. व त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून पोलिसांना एक कोविड योद्धा छोटीशी भेटवस्तू म्हणून सन्मानित केले व पोलिसांचे आत्मबळ आणखी वाढवले.
असे हे पोलीस मित्र उदय आठल्ये यांनी अनेक गोष्टींना छेद देवून वाढदिवस साजरा केला. व आपल्या पोलीस बांधवाना कोरोनाच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी निमित्त कोविड योद्धा सन्मान देऊन पोलीस बांधवाचा सन्मान केला. नेहमी पोलीसांना मदत व सहकार्य करणारे श्री उदय आठल्ये यांचे नाव कार्यामुळे प्रकाशझोतात आले . सातारा जिल्ह्याचे सूपूत्र उदय आठल्ये यांना
लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे. आपले शिक्षण पूर्ण करुन स्व:ताचा व्यवसाय व नोकरी बघत सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रीय सहभाग असतो. पोलीस मित्र उदय आठल्ये हे कधीही प्रसिद्धी मागे न लागता आपल्या कार्यास प्राधान्य देतात. नागरिक पोलीस यांच्या विषयी नितांत अभिमान बाळगत व अन्यायाला पाठीशी न घालता सदैव न्यायाची भूमिका घेतात. पोलीसांवर अन्याय होईल तिथ पोलीसांच्या पाठीमागे उभे राहणे हा त्यांचा विषेश गुण आहे .
नैसर्गिक आपत्ती मध्ये त्यांनी 270 आकर्षक साड्या पाठवून देत त्यांनी सामाजिक भान जपले व त्याच कालावधी मध्ये शाहूपूरी पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली आनेवाडी टोल नाका येथे दोन दिवस चहा पाणी नाष्ता वाटप केले
कोरोनाच्या काळात लाँगडाऊन होताच पोलीसांची काळजी घेणारा कोण असेल तर तर एकमेव व्यक्तिमत्व उदय आठल्ये हेच होते .सातारा शहर पोलीस स्टेशन
शाहूपूरी पोलीस स्टेशन
सातारा तालूका पोलीस स्टेशन या ठिकाणी
चहा पाणी नाष्ता बिस्कीट वाटप केले व,आपल्या सहकारी मित्रांची काळजी देखील घेतली .
याच वेळेस कोरोनाचा काळ खडतर असताना सर्व सामान्य लोक हैराण झाले होते. याच वेळी सातारा तालूका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोर गरीबांना धान्य सँनिटायझर वस्तू
स्वरुपात वाटप केली.
कोरोनाच्या काळात
पोलीस बांधवाना शक्य होईल तितके सँनिटायझर वाटप केले व काही मदत लागली तर नक्की सांगा हा बहुमुल्य आश्वासन दिले …
पोलीस वसाहत रस्त्या संदर्भात पाठपुरावा
सातारा पोलीस वसाहत रस्त्याची अवस्था बिकट होती. ही बाब उदय आठल्ये यांना कळताच त्यांनी त्या बाबतीत पाठपुरावा सुरु केला व वेळोवेळी संबधित विभागाला निवेदना द्वारे पाठपुरावा करुन आपल्या पोलीस बांधवाना चांगला हक्काचा रस्ता मिळवून दिला …
आज अखेर उदय आठल्ये यांच्या
प्रामाणिकपणा मुळे पोलीस अधिकारी वर्ग देखील प्रभावित झाला आहे. पोलीस व पोलीस मित्र हा समन्वय राखण्यास उदय आठल्ये हे यशस्वी झाले आहेत. आज काम करत असताना अनेक अधिकारी उदय आठल्ये यांचे कौतूक करताना दिसतात.विषेश करुन
या मध्ये देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्री.सुशीलकुमार शिंदे हे सातारा दौऱ्यावर असताना श्री.उदय आठल्ये यांनी सदिच्छा भेट घेतली व उदय आठल्ये यांचे पोलीसांच्या विषयी सामाजिक कार्य बघता श्री.शिंदे यांनी मनभरुन कौतूक केले कारण सामाजिक कार्यात आशीर्वाद महत्त्वाचे असतात हेच उदय आठल्ये यांनी जपले आहे. अशा या सच्चा पोलीस मित्रास भावी वाटचालीस मनापासून शूभेच्छा श्री उदय आठल्ये यांच्या हातून पोलिसांच्या विषयी हे कार्य असेच घडत राहो.
भारत रेघाटे












Leave a Reply