*सन्मान शिक्षणाचा* ..
*अपर पोलीस अधीक्षक डाँ.श्री. दत्ताराम राठोड यांनी शिक्षण क्षेत्रातील उच्च अशी पी.एच.डी व सोबत एकूण 12 पदव्या प्राप्त केल्या बद्दल*..
*सातारा पोलीस पोलीस मित्र समुहाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री.उदय आठल्ये यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सातारी कंदीपेढ्याचा हार व सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला* ..
डाँ.राठोड हे शिरापूरचे (ता.पार्थर्डी) येथील रहीवासी असून सध्या अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत . डाँ. दत्ताराम राठोड यांना गोंडवना विद्यापीठाने पीएच.डी प्रदान केली आहे. राठोड यांनी सिरोंचा व दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील तेलगू भाषेचा.सांस्कृतिक सामाजिक प्रभाव व सिंरोचा येथील ऐतिहासिक महत्त्व या विषयावर प्रबंध सादर केला होता. विषेश बाब म्हणजे गोंडवना विद्यापीठातील आजपर्यंतचा हा सर्वात मोठा प्रबंध आहे. त्यांना पीएच.डी मिळताच जन्मभूमी मधील नागरीकांनी आनंदोत्सव साजरा केला होता . *सातारा येथील प्रसिद्ध पोलीस मित्र.श्री.उदय आठल्ये यांनी बोलताना सांगितले की अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असताना.अजून ही शिक्षणाची ओढ असल्याचे राठोड यांच्या कृतीमधून दिसून येत आहे* …












Leave a Reply