आंनदवार्ता सातारा ते लोणंद या महामार्गाचे काम सुरू वडूथ पंचक्रोशीच्या आंदोलनाला यश …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आंनदवार्ता
सातारा ते लोणंद या महामार्गाचे काम सुरू
वडूथ पंचक्रोशीच्या आंदोलनाला यश
Live maharashtra 24
सातारा प्रतिनिधी :- सातारा ते लोणंद या नँशनल हायवेच्या रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असून सदरचे काम अतिशय उत्तम प्रकारे होत असल्याची माहिती वडूथ ,ता.सातारा. गावचे सरपंच किशोर शिंदे व छत्रपती उद्यन महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन साबळे यांनी दिली.
नँशनल हायवेचे अधिकारी शत्रुघ्न काटकर व कंत्राटदार धिरज यांनी वडूथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात डांबरीकरण करून दिल्या बद्दल अभियंता पवन सिंग व इतर मान्यवरांचा सरपंच किशोर शिंदे व मदन साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी live maharashtra 24.शी बोलताना सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे म्हणाले की महामार्गाचे काम अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे. आम्ही सर्व गावातील लोकांना आवाहन करतो की प्रत्येक गावातील लोकांनी त्यांना सहकार्य करावे. कामाचा दर्जा चांगला करून घ्यावा. इतर कोणत्याही लोक प्रतिनिधीनी या रस्त्याच्या कामासाठी मदत केली नाही. मात्र खासदार उद्यनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांनी या कामासाठी लाख मोलाची मदत केली. वडूथ च्या ग्रामस्थांनी सुध्दा चांगले सहकार्य केले. पण आम्ही या कामाचे श्रेय ,मोठेपणा घेत नाही. जनतेसाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
यावेळी वडूथ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, युवक ,सामाजिक कार्यकर्ते हरिदास मोरे, संतोष साबळे, अजित साबळे उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *