माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे उमेदवार श्री. गणेशदादा काटकर यांनी संपूर्ण मतदारसंघात झंझावाती दौरा करून पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. त्यावेळी पदवीधर मतदारांकडून श्री. गणेश काटकर यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे मत पदवीधर मतदारानी सातारा सांगली कोल्हापूर दौऱ्यादरम्यान व्यक्त केले. त्यांचा पुणे येथील जनसंपर्क ही मोठा असल्याने निश्चितच ते विजय श्री खेचून आणतील असे मत चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.
पुणे पदवीधर मतदारसंघात श्री. गणेशदादा काटकर यांनी मतदार नोंदणीपासून पदवीधर लोकांच्या अडीअडचणी सोडवून व वेळोवेळी सहकार्य करून पदवीधरांचे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यामध्ये युवकांचे जाळे निर्माण केलेले आहे. ते गेल्या दहा वर्षापासून सामाजिक काम करीत असताना युवकांचेही संघटन मोठ्या प्रमाणात केलेले होते. श्री. काटकर यांनी नाव नोंदणी केलेल्या सर्व पदवीधरांच्या मोबाईल ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्ते परहस्ते भेटून पुणे पदवीधर मतदारसंघात एक नंबर पसंती दर्शविण्याची विनंती केलेली आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते यांच्यासोबत पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मतदारांच्या भेटी गाठी दौरा केला, त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि भविष्यामधील युवकांसाठी रणनीती आखण्याचे नियोजन करण्यात आले. स्वीकारलेली जबाबदारी यशस्वीपणे व निस्वार्थीपणे पार पाडण्याकरता माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अहोरात्र प्रयत्न सुरू असल्याचे श्री गणेश दादा काटकर यांनी बोलताना सांगितले.












Leave a Reply