माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी मतदार होणार आहे. त्यामुळे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार जोरदार प्रचार करताना पाहायला मिळतील.
राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांसाठी आजचा रविवार म्हणजे सुपर संडेच म्हणावा लागेल.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, मनसेच्या रुपाली पाटील ,अपक्ष गणेश काटकर आणि जनता दल सेक्यूलरचे शरद पाटील. हे निवडणूक रिंगणात आहेत. महत्वाची बाब म्हणजे संग्राम देशमुख, अरुण लाड आणि शरद पाटील हे तिनही उमेदवार सांगलीचे आहेत. त्यामुळे सांगलीतील मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होईल.तर सातारा मधून अपक्ष उमेदवार गणेश काटकर यांनी सक्रिय प्रचारात आघाडी घेतल्या मूळे सातारा मध्ये मतविभाजन होणार नाही असे दिसते अशास्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुण्यावर अवलंबून असणार आहे. तर कोल्हापूर, सोलापूर मतदारांचा कौलही निर्णायक ठरु शकतो.
दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्यात लढत होत आहे. दत्तात्रय सावंत आणि जितेंद्र पवार हे सोलापूरचे आहेत, तर आसगावकर कोल्हापूरचे. दरम्यान जो उमेदवार पुण्यातून सर्वाधित मतं घेणार तो उमेदवार विजयी ठरण्याची शक्यता अधिक आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी 62 उमेदवार तर शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे पदवीधरसाठी एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदार मतदार आहेत. तर शिक्षक मतदारसंघात 72 हजा र 545 मतदार आहेत.












Leave a Reply