माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
पुणे पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले उमेदवार गणेश सुखदेव काटकर मराठा क्रांती मंच चे संस्थापक अध्यक्ष महेश राणे यांनी आज पाठिंंबा जाहीर केला.
महाराष्ट्र राज्यात विधानपरिषद च्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत असून या निवडणुकीत मराठा समाजाच्या प्रश्ना बाबत प्रमुख राजकीय पक्ष उदासीन दिसून येत आहेत राज्यात 58 मूक मोर्चे 45 बलिदाने तसेच ठोक मोर्चे त्याच बरोबर 13500 केसेस इतक्या मोठ्या संघर्षाची प्रशभूमी असणारा हा लढा आहे असे असताना अजूनही मराठा समाजाला कोणताही राजकीय पक्ष न्याय देत नाही हे स्पष्ट आहे.
आज मराठा समाजाने जे आपल्या प्रचंड संघर्ष करून मिळवले ते आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणून मराठा क्रांती मंच च्या वतीने आम्ही आता शांत न बसता राजकीय लोकांनी मराठा समाजाच्या विरोधात चालवलेल्या षडयंत्र च्या विरोधात भूमिका घेत असून पुणे पदवीधर मतदारसंघात मराठा आरक्षण चळवळी मधील सक्रिय कार्यकर्ता त्याच बरोबर सामान्य कुटूंबातील पण उच्चशिक्षित,सुसंस्कृत असणारा युवक गणेश सुखदेव काटकर यांना आम्ही पाठिंंबा देत असल्याचे महेश राणे यांनी सागितले, व तसे पत्रक काढले .मराठा क्रांती मंच च्या वतीने आवाहन केले की,गणेश सुुुखदेव काटकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
गणेश काटकर यांचा अनुक्रमांक २० असून पसंती क्रमांक १ चे मत त्याना द्यावे ही सातारा सांगली कोल्हापूर पुणे जिल्ह्यातील सर्व पदवीधर बांधवांना विनंती करत आहोत












Leave a Reply