माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे उमेदवार गणेश काटकर यांनी काल सांगली जिल्हा दौरा केला. त्या दौऱ्यानिमित विटा येथे पत्रकार परिषदमध्ये बोलत असताना त्यांनी निवडणुकीत उभे असणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या कार्य पद्धतीवर टीकास्त्र सोडले. या पत्रकार परिषदे च्या निमित्ताने जिल्ह्यातील पदवीधर मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.
आजपर्यंत मतांची झोळी घेऊन फिरणाऱ्या प्रतिनिधींनी स्वातंत्र्य काळापासून किती पदवी धरांचे प्रश्न सोडवले. वा किती युवकांना रोजगार दिला. निवडणुका आल्या की धनसंपत्ती च्या जीवावर निवडणुका जिंकायच्या? परत मागले दिवस पुढे… आता पदवीधर अशा राजकारणाला कदापिही भुलणार नाहीत. पदवीधरांची समस्या, आणि त्यांचे प्रश्न सरकारी दरबारात मांडून ते सोडवण्यासाठी च माझ्या सारख्या पदवीधर, उच्च शिक्षित उमेदवाराची उमेदवारी असून पदवीधर युवकांनी मोठ्या ताकतीने माझ्या पाठीशी राहावे, पदवीधर उमेदवार आमदार म्हणून गेलेल्यानी किती पदवीधरां चे प्रश्न सोडवले. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य कुटुंबातील सदस्य म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे.असे ते पत्रकार व पदवीधर यांच्या पत्रकार परिषदमध्ये म्हणाले.












Leave a Reply