म्हसवडच्या श्री सिद्धनाथाचा शाही विवाह सोहळा अखेर रद्द

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने- पाटील

सालाबादप्रमाणे होणारा येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे कुलदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचा सार्वजनिक  शाही विवाह सोहळा चालू वर्षी शासनाकडून रद्द करण्यात आला असून मंदिरात अंतर्गत पद्धतीने मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत उरकण्यात येणार असून तमाम भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येण्यास मनाई करण्यात आली आहे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये,कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी शासनाने तातडीची पावले उचलली आहेत,
त्यासाठी चालू वर्षी श्री सिद्धनाथ  जोगेश्वरीच्या शाही विवाह सोहोळयादिवशी म्हणजे गुरुवार दि .26 .11.2020रोजी मंदिर व मंदिर परिसरसतील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय       शासनाकडून घेण्यात आला असून गुरुवार दि.26/11/2020 रोजी एका दिवसासाठी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असून भाविकांनी या दिवशी मंदिराकडे फिरकू नये असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
तरी गुरूवार दि.26/11/2020 रोजी एक दिवसासाठी मंदिर  भाविकांना दर्शनासाठी बंद  ठेवण्यात येणार असल्याने बाहेरगावच्या व स्थानिक तमाम भाविकांनी याची नोंद घेऊन शासनाला व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करावे असे आवाहन सिध्दनाथ देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.
15 डिसेंबर रोजी येथील रथयात्रा असून चालू वर्षी यात्रा भरणार की नाही या संभ्रमात सर्वजण आहेत मात्र यावर शासन काय निर्णय घेईल त्यानुसार कार्यवाही होईल असेही सांगण्यात आले,,
==========================

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *