माण-खटाव प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील
निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दि. १ डिसेंबर २०२० रोजी होत असुन, काल दि.१२ रोजी सातारा जिल्ह्यातुन श्री.गणेश काटकर यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष राव यांच्याकडे पुणे आयुक्तालय येथे दाखल करण्यात आला.
पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीचे बिगुल वाजले असुन भाजपा आणि महाविकास आघाडी यांनी आपापले उमेदवार जाहीर केले असून दोघांनीही सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
दरम्यान गणेश काटकर यांचा युवकांशी असणारा दांडगा संपर्क तसेच मराठा क्रांती मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि विविध चळवळींच्या माध्यमातून शहरी तसेच ग्रामीण भागातील युवकांशी असणारा जनसंपर्क पाहता त्यांनी हि निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार त्यांनी काल दि.१२ रोजी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष राव यांच्याकडे आयुक्तालय पुणे यांच्याकडे दाखल केला.
श्री. गणेश काटकर यांना जरी कोणताही राजकीय वारसा नसला तरी पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात असणारा दांडगा जनसंपर्क तसेच त्यांच्यापाठीमागे उभी असणारी युवकांची ताकत, राज्यस्तरावर बेरोजगार युवकांच्या प्रश्नावर आजवर केलेले काम यासगळ्याच्या जोरावर हि निवडणूक लढणार आणि जिंकणारच असा जबरदस्त विश्वास श्री.गणेश काटकर यांनी यावेळी लाईव्ह महाराष्ट्र २४ शी बोलताना व्यक्त केला.
गणेश काटकर यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ
निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी गणेश काटकर यांनी पुणे, सातारा सांगली कोल्हापूर याठिकाणी मेळावे घेवुन उमेदवारी बाबत सल्लामसलत केली तेव्हा युवकांकडून उस्फुर्त पाठिंबा पहायला मिळाला. अनेक युवकांनी गणेश काटकर यांचे जल्लोषात स्वागत केले तर काहींनी गणेश काटकर यांच्या प्रचारासाठी पाचही जिल्ह्ये पिंजुन काढणार असल्याचे जाहीर केले.












Leave a Reply