चिमुरडीचा जिव वाचवण्यासाठी खटाव तालुक्यातील निमसोडच्या युवकांचा आदर्शवत उपक्रम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी ::-धनंजय माने-पाटील

निमसोड ता. खटाव याठिकाणी तरुण पिढीने आपआपसातील वाद-विवाद,राजकारण, मतभेद,जात,धर्म हे सर्व सोडून मोरे कुटुंबातील लहान मुलगी आजारी असल्याने तिला रक्ताची गरज भासल्याने डॉ.ज्ञानेश्‍वर घाडगे यांनी सर्व तरुणांना रक्तदान करण्याबाबत आव्हान केले.

त्यानुसार युवा शक्तीची ताकद ओळखणारे डॉ. ज्ञानेश्‍वर घाडगे हे नेहमीच तरुणांना एकत्र घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंती इतर सामाजिक कार्यक्रम तरुणांना सोबत घेऊन करत असत त्यामुळे त्यांच्याआवाहना प्रमाणे 50 ते 60 तरुणांनी एकत्र येऊन मोरे कुटुंबातील लहान मुलीला केली रक्तदानाची मदत

यशवंतराव चव्हाण ब्लड बँक कराड यांच्या सहयोगाने व डॉक्टर घाडगे यांच्या प्रयत्नाने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

यापुढे सुद्धा रक्ताची गरज भासल्यास आपण तरुणांना एकत्र करून आणखीन रक्तदान कार्यक्रम राबवू असे त्यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 शी  बोलून दाखवले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *