नियोजीत नवीन वडुज पोलिस ठाण्याच्या आवारात पोलीस अधीक्षक सातारा यांच्या हस्ते वृक्षारोपण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी :-धनंजय माने-पाटील

 

उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी श्री. डाॅ.निलेश देशमुख यांनी कार्यभार स्वीकारल्यापासुन पोलीस स्टेशनमध्ये सर्व सुविधा असाव्यात कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करता यावे याकरता ते नेहमी प्रयत्नशील असतात.जनतेमध्ये सध्या ते भरपूर लोकप्रिय होत आहेत त्यांच्या कामाचा एक वेगळा पॅटर्न दिसून येत आहे.विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामकाजामध्ये गतिशीलता दिसायला सुरुवात झाली आहे त्यामुळे सामान्य माणसातून पोलिसांच्या बद्दल आदराची भावना व्यक्त होत आहे.

वर्ष-दीड वर्षापूर्वी वडूज येथील नवीन तहसील कार्यालयाचे बांधकाम झाल्यानंतर जुन्या ठिकाणचे तहसील कार्यालय नवीन इमारतीमध्ये हलवण्यात आले, इमारतीमध्ये वडूज पोलिस स्टेशनचा सुद्धा कार्यभार होता सदर इमारती मध्ये पोलिस स्टेशनची सध्याची इमारत कामकाजा करता अपुरी असल्याने काम करताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत असे कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून येत आहे.

वडूज पोलीस स्टेशन मधील पोलीस लाईन च्या पाठीमागे मोकळ्या जागेमध्ये नवीन नियोजित वडूज पोलिस स्टेशनचे इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे सदर ठिकाणी आज सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. धिरज पाटील यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्षारोपण केल्यानंतर सध्या दिवाळीचा सण असल्याने दिवाळीच्या फराळाचे सुद्धा वाटप करण्यात आलं त्यावेळी पोलिस कर्मचारी व गृहरक्षक यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं समाधान दिसून आले.

सदर कार्यक्रमाकरिता जिल्हा पोलीस प्रमुख श्री.अजयकुमार बन्सल, श्री.धिरज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख, तसेच वडुज पोलीस स्ठेशनचे प्रभारी मालोजीराजे देशमुख  यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी हजर होते.

नवीन इमारतीच्या आवारात वृक्षारोपण झाल्याने आता लवकरच नूतन इमारतीचे उद्घाटन कधी करणार यावर वडूज करांचे यांचे लक्ष आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *