जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत माण-खटावसाठी महत्वपूर्ण बैठक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माण-खटाव प्रतिनिधी::-धनंजय माने-पाटील

आज मंत्रालय मुंबई याठिकाणी मा. जलसपंदा मंत्री श्री जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली  माण-खटावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.प्रभाकरजी देशमुख यांच्या उपस्थितीत अभयसिंह जगताप यांच्या नियोजनातुन विविध पाणी प्रश्नांवरसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये माण-खटावमधील विविध प्रश्नांसोबत वरकुटेमलवडी पंचक्रोशीतील वरकुटे,शेनवडी,काळचौंडी,विरळी,महाबळेश्वरवाडी,बनगरवाडी या गावांचा वर्षवर्षोनवर्ष प्रलंबित असणारा शेतीपाणीप्रश्न प्रामुख्याने मांडण्यात आला.  टेंभू आणि तारळी योजनेतून पाणी देण्यासंदर्भात आचारसहींता सपंल्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे मंत्री महोदयांनी सागिंतले.

योजनेतून कश्या प्रकारे सहज पणे पाणी देऊ शकतो याचे अतिशय छान सादरीकरण अभयसिंह जगताप यांच्याकडून करण्यात आले.  त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर सुध्दा सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानी सुध्दा लक्षपुर्वक प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

मा. प्रभाकर देशमुख साहेब यांचे नेतृत्वाखाली माण आणि खटाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर पाणीप्रश्न मार्गी लागण्याच्या विश्वासाबरोबरच सर्व कार्यकर्त्यांनी ना.जलसंपदामंत्री जयंत पाटीलसाहेब तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माण-खटावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.प्रभाकरजी देशमुखसाहेब, पाणीप्रश्न तळमळीने मांडणारे अभयसिंह जगताप यांचे लाईव्ह महाराष्ट्र 24 शी बोलताना आभार व्यक्त केले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *