सुयोग्य नियोजनात श्री भोजलिंग देवस्थान यात्रा संपन्न

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रतिनिधी :धनंजय माने -पाटील

दि.५ (भोजलिंग डोंगर) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री. भोजलिंग देवस्थान जांभूळणी ता. माण येथील श्री. भोजलिंग देवस्थानची वर्ष परंपरेनुसार दसऱ्यानिमित्त होणारी यात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी हजारो श्रद्धाळू भाविक दरवर्षी श्री भोजलिंग देवस्थान भोजलिंग डोंगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर  जमत असतात.

फक्त माण तालुक्यातीलच नव्हे तर सांगोला,मंगळवेढा,जत अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच कर्नाटकातून  दरवर्षी भावीक मोठया संख्येने देवाचे दर्शन घेण्यासाठी भोजलिंग डोंगरावर येत असतात. त्याचबरोबर जांभुळणी,बनगरवाडी,वरकुटे, शेनवडी, काळचौंडी,विरळी,वळई या पंचक्रोशीतील लोक ही दसऱ्यानिमित्त सीमोउल्लंघनासाठी भोजलिंग डोंगरावर मोठ्या प्रमाणावर जमत असतात.

दिवसभर गजी ढोलाचा कार्यक्रम चालू असतो, विविध खेळण्याची दुकाने, तसेच खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे  संपूर्ण डोंगरावर रेलचेल पहावयास मिळते. त्याचबरोबर दुपारनंतर विरळी येथून जानुबाई देवीची पालखी डोंगरावर भोजलिंग देवास भेटण्यासाठी येते त्यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

म्हसवड पोलीस स्टेशनचे परफेक्ट नियोजन

यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चार दिवसांपूर्वी म्हसवड पोलीस स्टेशनच्या वतीने नियोजनाची बैठक श्री भोजलिंग डोंगर या ठिकाणी घेण्यात आली होती.

त्या दृष्टीने येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसवड पोलीस स्टेशन कडून अतिशय नियोजनबद्ध असा बंदोबस्त लावण्यात आला होता. चोऱ्यामाऱ्या होऊ नयेत तसेच पार्किंगचेही सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनी राजकुमार भुजबळ स्वतः दिवसभर जातीने लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर परिसरातील पोलीस पाटलांना बरोबर घेतल्याने बंदोबस्ताचे काम आणखी सोपे झाले.

या कामी म्हसवड पोलीस स्टेशन कडून गोपनीय अभिजीत भादुले, नितीन धुमाळ, नंदकुमार खाडे, रवी डोईफोडे, सुरज काकडे, नवनाथ शिरकुळे, दुबळे मॅडम, यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *