किल्ले प्रतापगडचा विकास होणार सुशोभीकरणासाठी दहा कोटी रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

किल्ले प्रतापगडचा विकास होणार

सुशोभीकरणासाठी दहा कोटी रुपये मंजूर : जिल्हाधिकारी डुडी

सातारा

जिल्ह्याचा ऐतिहासिक प्रतापगड किल्ला खूप जुना असून त्याची प्राचीन दगडाची भिंत पडली होती त्यावरुन ‌अजुन काही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
किल्ले प्रतापगड हा ऐतिहासिक किल्ला असून त्या किल्ल्याचे नूतनीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे ज्याप्रमाणे सुरुवातीला किल्ला होता त्याचप्रमाणे डागडुजी करण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीमधून दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत नोव्हेंबर पासून येथे काम सुरू होऊन पुढील वर्षी मे अखेरपर्यंत काम पूर्णत्वास जाईल असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.
ज्याप्रमाणे जुन्या दगडी पायऱ्या होत्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी दगडी पायऱ्या करणार असून त्याप्रमाणे किल्ल्यावरील चार तलाव आहेत त्यांचे गाळमुक्त धरण योजने अंतर्गत संवर्धन करण्यात येणार आहे. तलावातील संपूर्ण गाळ काढून तलावाची नव्याने बांधणी करणार आहे आणि तेथील गावकऱ्यांसाठी पिण्या योग्य पाणी करणार आहोत. त्याचबरोबर ५५ लि. पाणी प्रत्येक दिवशी त्यांना मिळणार असून त्याचबरोबर गावांचा अजूनही प्रश्न होता की त्यांना विजेचा प्रश्न होता तो विजेचा अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना २४ तास कशी वीज मिळेल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत तेथील लोकांना सर्व मूलभूत सुविधा त्यांना जागेवर मिळाले पाहिजे.असा प्रशासनाचा माणसं आहे. किल्ले प्रतापगड हा ज्याप्रमाणे सुरुवातीला होता त्याचप्रमाणे आता सुद्धा दिमाखात उभा राहिलेला दिसेल असे मत जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *